BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षक यांचा मृत्यू



 कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षक यांचा मृत्यू

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली

व्हिडीओ पहा


शिराळा,ता.१६: मुबई येथे सहायक पोलिस निरीक्षक असलेल्या शिराळच्या अमोल हणमंत कुलकर्णी यांच्या कोरोनामुळे शनिवारी पहाटे पाच वाजता राहत्या घरी मृत्यू झाला. त्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर सायन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमोल  शाहूनगर(मुंबई)   येथे  कार्यरत होते.त्यांनी रुग्णनिवेदन केले होते. गेली काही दिवस ताप व सर्दी यामुळे आजारी असल्याने घरीच होते. त्यांनी सायन रुग्णालय येथे १३ मे  रोजी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आलेला होता,.मात्र शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यांना सायन रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता मयत घोषित केले.त्यांचे आई ,वडील , भाऊ ,काका शिराळा येथे असून वडील वीज वितरण कंपनी मध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहेत. शाहूनगर येथे पत्नी व तीन वर्षांच्या मुलीबरोबर रहात होते.ते भांडुप पोलिस स्टेशन  प्रमोशनवर शाहू नगर पोलिस स्टेशनला डिटेक्शन ऑफिसर म्हणुन कार्यरत होते. भांडुप पोलीस ठाण्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी ही श्रद्धांजली वाहिली. ते मूळचे कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील आहेत. वडील शिराळा येथे नोकरीस असल्याने गेले तीस वर्षांपासून शिराळा येथे आहेत.ते याच ठिकाणी स्थायिक झाले आहेत.

जस लिहिलं तसचं झालं


२एप्रिल रोजी या सहायक पोलिस निरीक्षकांनी फेसबुकवर कोणी पाच कोटी देतोय,कोणी पाचशे कोटी देतोय पण आम्हीआमचे आयुष्य देतोय आशा आशयाची पोलीस बंदोबस्त फोटो टाकून ही पोस्ट केली होती.आज ती गोष्ट त्यांच्या बाबतीत खरी ठरली.त्यांच्या या पोस्टची समाज माध्यमावर चर्चा होती.

Post a Comment

0 Comments