BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात आज नवीन तीन रुग्ण कोरोणाबाधित --जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी


सांगली जिल्ह्यात आज नवीन तीन रुग्ण कोरोणाबाधित --जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी 

सांगली दि.25 (जि.मा.का) सांगली जिल्ह्यात आज तीन रुग्ण  कोरोनाबाधित झाले असून यामध्ये झोळंबी (आष्टा) तालुका वाळवा येथील दिनांक 23 मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची  पत्नी (वय 25वर्ष) कोरोना बाधित झाली आहे.



     कामत (खरसुंडी जवळ)तालुका आटपाडी येथील 65 पुरूष दिनांक 23 मे रोजी मुंबईहून आलेले होते. सदरची व्यक्ती कोरोनाबाधित ठरली आहे.
      कुंडलवाडी तालुका वाळवा येथील संस्थात्मक अलगीकरणात असलेला व दिनांक 15 मे रोजी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे वडील (वय ५७वर्ष ) कोरोना बाधित झाले आहेत .
       सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत उपचाराखाली 36 रुग्ण असून आज अखेर 47 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत . तर आज अखेर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत 85 रुग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.तर आज एक रुग्ण कोरोणा मुक्त झाला आहे.
     जे चार रुग्ण चिंताजनक आहेत यामध्ये नागोळे येथील 48 वर्षाचा पुरुष , मोहरे तालुका शिराळा येथील ५० वर्षाचा पुरुष,  खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षाचा पुरुष व धारावी ते मालगाव येथे बसने आलेल्यां मधील 75 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण अतिदक्षता विभागात विशेष उपचाराखली आहेत.
         दिनांक 19 मे रोजी मुंबईहून आलेली 87 वर्षीय महिला अतिदक्षता विभागात उपचाराखली असून तिचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे .
       आज कोरोनामुक्त  झालेल्यांमध्ये बलवडी येथील 55 वर्षाचा पुरुष असून आयसोलेशन विभागात उपचाराखली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली

Post a Comment

0 Comments