कोविड-19 पासून बचावासाठी वारांगणांनी देहविक्रय व्यवसाय थांबवावा
महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांचे आवाहन
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जगभर कोरोनाचे थैमन वाढतच आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वरांगनांनी देहविक्रय व्यवसाय काही काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.सांगली जिल्ह्यातील प्रेमनगर, गोकुळनगर, स्वरुप नगर व उत्तमनगर येथे भेट देऊन कोरोना पासून स्वत:चा व इतरांचा बचाव करण्यासाठी काही काळ देहविक्रय थांबविण्यात यावा व आरोग्य विषयक काळजी घेण्यात यावी. तात्पुरता उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी ज्या महिलांना रेशनकार्ड आहेत त्यांना रेशनकार्डवर धान्य देण्यात येईल व ज्या महिलांकडे रेशनकार्ड उपलब्ध नाहीत त्यांना सदर काळात जिवनावश्यक अन्न धान्याचे किट जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील. असे सांगून अशा महिलांना सामाजिक स्वास्थ राखण्यासाठी जिवनावश्यक वस्तु उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने, सखी वन स्टॉप सेंटरचे केस वर्कर सरिता वाडेकर, कॉन्सिलर राजश्री काळे, सामाजिक कार्यकर्त्या कलावती पवार यांची उपस्थिती होती.
0 Comments