BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493





shi0501
वाकुर्डे खुर्द येथे आढळुन आलेले बिबट्याचे ठसे
shi0502,03,04
मानेवाडी (वाकुर्डे बुद्रुक)येथे झाडावर बसलेला बिबट्या
शिराळा,ता.५:वाकुर्डे बुद्रुक व वाकुर्डे खुर्द येथे दोन शेळ्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले असुन बिबट्याचे पिल्लु झा़डावर दिसल्याने त्यास अनेकांनी कॅमे-यात कैद केले.बिबट्याच्या या मुक्त वावरामुळे शिराळा उत्तर भागात भितीचे वातावरण पसरले आहे.
वाकुर्डे खुर्द येथे आज पहाटे साईनाथ गुंगा पाटील यांच्या शेड मधील शेळीवर बिबट्याने हल्ला करुन तीला ठार मारले.वासराच्या कानावर पंजा मारुन त्यास जखमी केले. त्यांच्या शेडची चि-याची असणारी कच्ची भिंत पाडली.साईनाथ सकाळी जनावरांना वैरण घालण्यासाठी गेले असता शेळी मृतावस्थेत तर वासरु जखमी आढळुन आले.त्या शेळीची दोन कोकरे गायब झाली आहेत. शेड परिसरात बिबट्याचे ठसे आढळुन आले आहेत.याबाबत वनपाल बी.डी.मुदगे,वनरक्षक पी.एन.पाटील यांनी पंचनामा केला.
वाकुर्डे बुद्रुक येथील मानेवाडीतील बामणकी येथे वसंत शंकर माने यांच्या शेळीवर रविवारी पहाटे बिबट्याने हल्ला करुन तीला ठार मारले.शेळ्यांचा आवाज ऐकुण वसंत शेडमध्ये गेले असता शेळी मृत आढळुन आली.पंचनामा वनपाल बी.डी.मुदगे व डी.ए.तासिलदार यांनी केला.
चौकट- बिनधास्त बिबट्या अन् शेतक-यांचा थरकाप
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता मी पाहुण्याकडे मानेवाडीला जात होतो.त्यावेळी शिवाजी माने झाडावर बिबट्याचे पिल्लु असल्याचे सांगत उसातुन बाहेर पळत आले. त्यावेळी मी व शेतातील इतर लोकांनी झाडाजवळ जावुन पाहिले असता बिबट्याचे पिल्लु बिनधास्त बसलेले दिसले.त्याचे फोटो माझ्यासह अनेकांनी काढले.लोकांची गर्दी वाढु लागली पण बिबट्याची मादी आली तर? या विचाराने सर्वांचा थरकाप उडाला आणि आम्ही सर्वांनी तिथुन पळ काढला.
युवराज जाधव वाकुर्डे खुर्द शेतकरी







Post a Comment

0 Comments