BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या शास्त्रज्ञांचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले अभिनंदन

शिराळा :येथील ‘आयसेरा बायोलॉजिकल’ या कंपनीला दिलेल्या भेटी प्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे,मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,विनायक शिंदे,दिलीप कुलकर्णी,नंदकुमार कदम, धैर्यशील यादव 

 त्या शास्त्रज्ञांचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले अभिनंदन 

 शिराळा ,ता२४:येथील ‘आयसेरा बायोलॉजिकल’ या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधण्याचे आव्हान स्वीकारले असून या कंपनीला भेट देऊन या लस साठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन देत त्या शास्त्रज्ञांनचे अभिनंदन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
 या कंपनीला केंद्र सरकारच्या Central Drugs Standard Control Authority ने लसीची निर्मिती आणि चाचण्यांसाठी हिरवा कंदील दिला असल्याने त्यांनी लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.  या कंपनीला तहसिलदार गणेश शिंदे, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी भेट देऊन पाहणी केली. कोरोनावर लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी अभिनंदन केले. ह्या संशोधनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी आयसेराचे संचालक विनायक शिंदे यांनी कंपनीची व दिलीप कुलकर्णी यांनी संशोधनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी कंपनीचे संचालक नंदकुमार कदम, धैर्यशील यादव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments