चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन करताना संचालक मा. हंबीरराव पाटील व सौ. लक्ष्मीताई पाटील. शेजारी अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सौ. सुनीतादेवी नाईक, बाबासाहेब पवार, शिवाजीराव घोडे-पाटील, यु. जी. पाटील, विजयराव नलवडे, शिवाजी पाटील, दत्तात्रय राणे, सुनंदा सोनटक्के आदी.
भाजप सरकारने शासकीस विज खरेदीत घट करुन कारखानदारी अडचणीत आणली: माजी आमदार मानसिंगराव नाईक
शिराळा:प्रतिनिधी
सहकारी साखर कारखान्याच्या विजनिर्मिती प्रकल्पातून निर्मित झालेली विज महाराष्ट्र शासन खरेदी करत असलेल्या दराबाबत झालेल्या करारात दरवर्षी 2 टक्के वाढ देण्याचे समाविष्ठ असताना, भाजपने वाढ करायचे सोडूनच द्या, त्यात 1 रुपया 38 पैशाची घट केली आहे. त्यावरून या सरकारचा सहकारी साखर कारखान्याचे बघण्याचा दृष्टीकोना लक्षात येतो, असे प्रतिपादन अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. सर्जेरावदादा नाईक बँकेने माजी अध्यक्ष हंबीरराव नाईक प्रमुख उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, भाजप सरकारचा एकूणच सहकारी साखर कारखानदारीकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. जे सहकारी साखर कारखाने विजनिर्मित करत आहेत. त्यांच्याकडून राज्य शासन विज खरेदी करते. त्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने जो करार केला. त्यानुसार प्रतियुनिटचा दर 4.79 पैसे एवढा होता. दरवर्षी त्यामध्ये 2 टक्के वाढ प्रमाणे आता हा दर 7.21 होणे क्रमप्राप्त होते. मात्र या सरकारने वाढ करायचे दूरच त्यात घट करत हा दर 6.24 पैसे केला आहे. त्यामुळे मिळणारे उत्त्पन्न 3.5 कोटी कमी झाले आहे. हा कारखानदारांचा तोटा आहे. साखरेच्या सध्याच्या धोरणामुळे कोट्याप्रमाणे साखर विक्रीत अडचण आहे. साखर व्यापारी टेंडर भरत नाहीत. भरलीच तर, तो कोटा उचलतीलच असे नाही.
ते म्हणाले, साडेबाराशे क्षमतेच्या साखर कारखान्याचे तीन टप्यात अधुनुकिकरण झाले आहे. आर्थिक शिस्त पाळली आहे. शेतकर्यांना योग्या परतावा देण्यात येत आहे. मी अध्यक्ष झाल्यापासून 18 वर्षांच्या काळात कारखान्याने प्रगतीचे अनेक टप्पे पार केले आहेत. विश्वासचा आलेख चढता ठेवला आहे. कोनत्याही बँकेचे हप्ते थकवलेले नाहीत. सभासद, कर्मचारी, तोडणी कामगार, वाहतूकदार आदी घटक समाधानी ठेवले आहेत. शेतकर्यांना जेवढ्या सोई, सवलती, अनुदान देता येईल त्या ठिकाणी दिले आहे. अजुनही आपणास खुप प्रगती साधायची आहे. सभासदानी आजवर जसा विश्वास दाखविला आहे, तसाच विश्वास आगामी काळातही दाखवावा. त्याच्या विश्वासाला पात्र राहून ‘विश्वास’ची प्रगती साधली जाईल.
प्रारंभी संचालक हंबीरराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीताई पाटील यांच्या हस्ते बॉलयर अग्निप्रदीपन झाले. स्वागत व प्रास्ताविक संचालक विजयराव नलवडे यांनी केले. यु. जी. पाटील व हंबीरराव पाटील यांचे मनोगत झाले. ज्या कर्मचार्यांच्या मुलांनी दहावीमध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उर्त्तीण झाले आहेत, त्यांचा सत्त्कार अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाला. इंजीनिअरींग विभागाकडील कर्मचारी सुरेश उपलाने यांचे अपघाती निधन झाले. त्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत म्हणून कर्मचार्यांनी एक दिवसाचा पगार मिळून 1.25 लाख व कामगार युनियन मार्फत 25 हजार अशी मिळून 1.50 लाख रूपयांची मदत उपलाणे कुटुंबाला मानसिंगभाऊंच्या हस्ते दिली.
या वेळी दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, सर्जेरावदादा नाईक बँकेचे अध्यक्ष संजय नाईक, युवा नेते विराज नाईक, बाबासाहेब पवार, अभिमन्यू निकम, संचालक सर्वश्री. शिवाजीराव घोडे-पाटील, भीमराव गायकवाड, बाबूराव नांगरे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, सुरेश पाटील, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, तानाजी वनारे, विश्वास पाटील, विश्वास कदम, दत्तात्रय राणे, संभाजी पाटील, निवास जगताप, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, शिराळ्याच्या नगराध्यक्ष सुनंदा सोनट्टक्के, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, बळीदाजी पाटील, माजी संचालक भीमराव पाटील, दुध संघाचे संचालक अनिल पाटील, कारखान्याचे खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, सभासद आदी उपस्थित होते.
0 Comments