अंत्यसंस्कारा नंतर कळाले तो कोरोना पॉझिटीव्ह
खेराडे वांगी ( जि.सांगली) - खेराडे वांगी (ता. कडेगाव) येथे एकावर अंत्यसंस्कार केले पण नंतर कळाळे तो कोरोना पॉझिटीव्ह होता. त्याच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या त्या 30 जणांना संस्थात्मक क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे खेराडे वांगीसह तीन किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र केले असून येथे शंभर टक्के लॉक डाऊन केले आहे.खेराडे वांगी गावातील एकजण मुंबई येथील एका हॉस्पिटल मध्ये ह्रदयाच्या उपचारासाठी 17 एप्रिल रोजी दाखल झाले होते.तर 18 एप्रिल राजी त्यांचे निधन झाले.त्यानंतर संबंधितांच्या पत्नींने त्याचदिवशी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचा मृतदेह मुंबईहून रुग्ण वाहिकेतून खेराडे-वांगी येथे आणला. नातेवाईकांनी मृतदेहावर 19 एप्रिलला अंत्यसंस्कार केले. बुधवारी (ता.22) दुपारी मयतच्या पत्नीने मुंबईतील संबंधित हॉस्पिटलमध्ये फोन माहिती घेतली असता मयत पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याचे समजले.यामुळे तालुका प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.याबाबत प्रांताधिकारी गणेश मरकड कडेगाव तहसीलदार डॉ.शैलजा पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक वायदंडे यांनी तात्काळ गावास भेट देऊन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या त्या 30 व्यक्तींना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
0 Comments