देववाडी :,येथे गवा रेडा आलेल्या परिसराची पाहणी करताना वनविभागाचे कर्मचारी. |
लॉक डाऊन मध्ये तो रात्रीचा आला भीती दाखवून गेला
शिराळा, ता.२८: देववाडी (ता.शिराळा ) येथील वारणा नदी परिसरात सोमवारी सायंकाळी दहा वाजता गवा रेड्याचे शेतक-याना दर्शन झाले. लॉक डाऊनमध्ये रात्रीचा आला भीती दाखवून पसार झाला.त्यामुळे रात्री शेतात पाणी पाजण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.मांगले, देववाडी, लादेवाडी परिसरातील शेतकरी रात्री वीज असल्याने शेतीला पाणी पाजण्यास रात्रीचे जातात. अशातच गवा रेडा या परिसरात दिसल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. गवा चांदोली अभयारण्यातून वारणा नदी काठावरून आला असल्याचा अंदाज आहे. गवा आल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख, सचिन पाटील, कर्मचारी नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी त्या परीसराची पहाणी केली. त्यावेळी पायाचे ठसे व इतर पुरावे आढळून आलेत.वनविभाग कर्मचारी व शेतकऱ्यांनी तो सर्व परीसर पिंजून काढला. पण गवा आढळून आला नाही.
0 Comments