शिराळ्यावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर
शिराळा,ता.३०:संचार बंदीचे उल्लंघन आणि अवैद्यरित्या सुरू असणारे धंदे रोखण्यासाठी आज पासून शिराळा पोलिसांनी ड्रोन कॅमेराच्या मदतीने सर्व काही नजर कैद करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे छुप्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.कोरोनचा पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा व उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलिसांनी चांगला बंदोबस्त सुरू ठेवला आहे. तरी ही संचारबंदीच्या काळात अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. कांहींचे चोरून अवैध धंदे सुरू आहेत. त्यास आळा बसून संचारबंदीचे नागरिकांच्या कडून योग्य पालन व्हावे या करिता शिराळा पोलिसांच्या मदतीला आता यापुढे अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा आला आहे. शिराळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांवर देखील आता या कॅमेराची नजर असणार आहे.एका ठिकाणावरून २ ते ३ किलोमीटर अंतरावरील ठिकाणावर लक्ष ठेवले जाणार आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे कॅमेरे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गल्ली, बोळात, टेरेस, खेळाची मैदाने, गावाशेजारी छुप्या मार्गाने सुरू असणारे काही अवैध धंदे यांना आणि विनाकारण नियम मोडणाऱ्या ना आता चाप बसणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस हवालदार मोतीराम खोत, सिद्धार्थ कांबळे, मोइद्दिन मुजावर, विनोद पाटील, अभिजित पवार उपस्थित होते.
कोट-
अनेक कारणे सांगून रस्त्यावर फिरणे, चौका चौकात तरुण एकत्र बसत आहेत. काही ठिकाणी मैदानावर खेळण्यासाठी एकत्र येत आहेत. चोरून अवैध धंदे सुरू आहेत. या सगळ्यांवर आता या अत्याधुनिक ड्रोन कॅमेराची नजर असेल. याद्वारे संचारबंदी चे उल्लंघन व नियम मोडणाऱ्या लोकांचे फोटो व व्हिडिओ शूटिंग या कॅमेरामधे रेकॉर्ड होईल. त्यानुसार अशा लोकांच्या वर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल.
विशाल पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
0 Comments