BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२५ पैकी १८ कोरोना अहवाल निगेटिव्ह तर सात प्रतीक्षेत

शिरशी:गावात १०० टक्के बंद पाळून औषध फवारणी सुरू आहे.


२५ पैकी १८ कोरोना अहवाल निगेटिव्ह तर सात प्रतीक्षेत


शिराळा:निगडी (ता.शिराळा) येथील त्या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २४ जणांन पैकी १८ जणांचे अवाहल निगेटीव्ह आले असून निगडीच्या सहा व काळुंद्रेच्या एकाच असे अशा २५ पैकी ७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. निगडीच्या त्या २४जणांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहाच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 
रेड येथील शिवाजीराव देशमुख कॉलेज येथे  संस्थात्मक विलागीकरण साठी १०० बेडची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शिराळा येथे विलगीकरण कक्षांची संख्या तीन झाली आहे.
  शिराळा तालुक्यात बाहेरून एकूण १६६०९ लोक आले असून त्या पैकी १७३९ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते.त्या पैकी १२०४ लोकांचा १४दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून ५३५ जणांचा अद्याप बाकी आहे.
देशमुख कॉलेजची पाहणी आज करून १००बेडचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे,माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख उपस्थित होते.
त्या तरुणी बरोबर तिच्या घरातील महिला पॉझिटिव्ह आल्याने निगडित कोरोना बधितांची संख्या दोन झाली आहे. निगडीत गेले चार दिवसांपासून आरोग्य यंत्रणा सतर्क असून ४८७ कुटुंबातील १४८५ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.  दररोज सर्व्हे सुरू आहे. गेले तीन दिवसांपासून निगडी गाव पुर्णतः लॉक डाऊन आहे.गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यां कोरोना बाधित महिलांच्या संपर्कात आणखी कोणी बाहेरील व्यक्ती आहेत का याची चौकशी सुरू आहे. सदगुरु आश्रम शाळेत शनिवारी विलगीकरण करण्यात आलेल्या तया १४जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. निगडी च्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या गावांनी बाहेरील भाजीपाला विक्रेते व इतर लोकांना गाव बंदी केली आहे.

शिरशीत कडकडीत बंद

शिरशी ग्रामस्थांनी तीन दिवस १००% लॉक डाऊन केले आहे.गावात औषध फवारणी सुरु आहे.गावात कडकडीत बंद पाळण्यासाठी  सरपंच एम. बी.भोसले, उपसरपंच सर्जेराव महिंद,  संजय महिंद सुरेश  महिंद, बापूसो जाधव, शेखर भोसले, बाजीराव पाटील ,रघुनाथ भोसले, शंकर भोसले , भगवान हसबनीस यांनी पुढाकार घेऊन लोकांच्या प्रबोधन केले.

Post a Comment

0 Comments