BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घरकुलासाठी ३० सप्टेम्बर पर्यंत कागदपत्रे पंचाायत समितीकडे जमा करा:आमदार शिवाजीराव नाईक


घरकुलासाठी ३० सप्टेम्बर पर्यंत कागदपत्रे पंचाायत समितीकडे जमा करा:आमदार शिवाजीराव नाईक
शिराळा/प्रतिनिधी
      ज्यांनी घरकुल मागणी अर्ज केले आहेत अशा सर्व कुटुंबानी ३० सप्टेम्बर पर्यंत सर्व कागदपत्रे पंचायत समितीकडे दाखल करावेत असे आवाहन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले आहे.
      यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव नाईक म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यगरीब-गरजू कुटुंबासाठी विविध शासकीय योजना आणल्या आहेत. सद्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबएस. सीएस. टीएन. टीओ. बी. सी. आदी वर्गात असणाऱ्या कुटुंबातील शिधपत्रिका धारकांना उज्वला योजनेतून गॅस,सौभाग्य योजनेतून वीज आणि घरकुले देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र जी कुटुंबे खुल्या वर्गातील असून मागासलेलीआर्थिक दृष्टया दुर्बल आहेत अशाही कुटुंबाना या योजना मधून  कुटुंबातील ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घरज्यांच्याकडे गॅस नाहीत्यांना गॅस देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अद्याप वीज मिळालेली अशाना सौभाग्य योजनेतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. 
      ज्या कुटुंबाला घर नाही अशा सर्व कुटुंबाना घर देण्याची योजना सुरु केली असून पंतप्रधान योजनेतून २०१९ अखेर तर मुख्यमंत्री योजनेतून २०२२ अखेर घर नसलेल्या कुटुंबाला घर देण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या कुटुंबाकडे स्वतः ची जागा नाही अशा कुटुंबाला सरकार ५० हजार रुपये जागा खरेदी घेण्यासाठी दिले जाणार आहेत. ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभेने निवडलेल जे लाभार्थी आहेत. अशा सर्वांनी आपली कागदपत्रे ३० सप्टेम्बर पर्यंत पंचायत समिती  शिराळा यांच्याकडे द्यावीत. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटीलसंचालक उत्तम पाटीलसरपंच विजय महाडिकमहादेव जाधवकुमार कडोले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments