BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा पोलिसांनी केली ५२४ दोन व चार चाकी वाहनावर कारवाई


शिराळा पोलिसांनी केली ५२४ दोन व चार चाकी वाहनावर कारवाई


शिराळा: शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉक डाऊन सुरू झाले पासून ४२२ मोटारसायकली व एकशे दोन चार चाकी  अशा ५२४ वाहनावर व चार विना परवाना दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
  २३ मार्च ते २२ एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत  ४२२ मोटरसायकली पैकी ५७ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. तर १०२ चार चाकी वाहनापैकी ३ चार चाकी वाहने जप्त केलेले आहेत. उरलेल्या वाहनांवर प्रतिबंधात्मक कारवाई, दंड करून चालकास समज देऊन सोडण्यात आलेले आहे. विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या प्रदीप सयाजीराव निकम, गोरख सर्जेराव निकम ( रा.शिराळा), सतीश राजाराम चरापले, अमर मानसिंग जाधव (रा.मांगले), भालचंद्र सुभाष म्होप्रेकर (रा. मानकरवाडी), शिवाजी बाळू सावंत (रा. शेडगेवाडी) या ६ जणांवर पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.  मास्क न वापरता रस्त्यावर फिरणाऱ्या ३९ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मॉर्निंग वाकला जाणाऱ्या १४३ लोकांना नोटिसा देऊन परत मॉर्निंग वॉकला न येण्याच्या अटीवर सोडून देण्यात आलेले आहे. विनाकारण सुरू असणाऱ्या मोबाईल शॉपी, पान शॉप व गिफ्ट सेंटरवर आणि मुहूर्त पाहणारे ज्योतिषी यांचेवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचार बंदीचे उल्लंघन करून बाहेर जिल्ह्यातून व पुण्या मुंबईवरून आलेल्या ९ नागरिकांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ५ चेक पोस्ट जिल्हा हद्दीसाठी यामध्ये मांगले ते काखे पूल, कांदे -सावर्डे बंधारा, सागाव -सरूड पूल ,गिरजवडे- उंडाळे रोडवर, पाचुंब्री - नांदगाव या रोडवर व १ मुख्य राज्यमार्ग आयटीआय कॉलेज समोर बायपास येथे अशा ६ चेक पोस्ट उभारण्यात आल्या आहेत. या चेक पोस्ट द्वारे बाहेरून येणाऱ्या वाहनांमधील लोकांची तपशीलवार माहिती घेण्यात येत आहे.
   पोलीस कर्मचारी यांच्यासह सर्व होमगार्ड यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दोन वेळा आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आलेली आहे.पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर कक्ष देखील बसविला आहे.

 रमजानच्या सणाचे पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सर्व धार्मिक विधी व इतर कार्यक्रम आपापल्या घरी राहून करावयाचे आहेत. कोणीही बाहेर धार्मिक स्थळाचे ठिकाणी प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी. शनिवारी २५ एप्रिल रोजी असणारी शिवजयंती शिवभक्तांनी घरीच साजरी करावी. वरील कार्यक्रम करत असताना कोणी सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्याचे वर गुन्हे दाखल करण्यात येतील.
विशाल पाटील, (सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिराळा )

Post a Comment

0 Comments