BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुंबईहुन गावी आलेल्या युवतीला कोरोनाची लागण

मुंबईहुन गावी आलेल्या युवतीला कोरोनाची लागण

शिराळा,ता.२४: निगडी  ता.शिराळा येथे मुंबईहुन आलेल्या २३ वर्षीय युवतीचा कोरोना विषाणू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तिच्या  जवळच्या संपर्कात आलेल्या ५ जणांना मिरज येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. उर्वरित १२ जणांना शिराळा येथील सद्गुरू आश्रम शाळेत संस्थात्मक विलगीकरण  कक्षात ठेवण्यात आले आहे.

सदर युवती व तिचा चुलत भाऊ मुंबईहून आले होते . त्यांना ताप आल्याने इस्लामपूर येथून मिरज आयसोलेशन कक्षाकडे पाठविण्यात आले होते. काल मिरज आयसोलेशन कक्षात अ‍ॅडमिट करण्यात आले होते. सदर महिलेचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिच्या भावाचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
हा अहवाल येताच प्रांताधिकारी नागेश पाटील,पोलिस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी तातडीने निगडी गावाकडे धाव घेतली. त्यानंतर गावात जाऊन त्यांच्या संपर्कात आलेले कुटुंबीय,. त्यांचा वाहन चालक, इतर चार कुटुंबीय असे पाच जणांना  मिरज येथील शासकीय  रुग्णालयात तर इतर संपर्कातील १२ जणांना शिराळा येथील सद्गुरू आश्रम शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले  आहे. गावात पूर्णतः लॉक डाऊन करण्यात आले आहे.
याचबरोबर सागाव येथील एक महिला व एक पुरुष हे शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले असता त्यांना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
      निगडी गावाकडे येणाऱ्या औंढी, पाडळी, अंत्री  बु. निगडी फाटा शिरशी व करमाळे गावाकडील येणारे रस्ते प्रशासनने सील केले आहेत.

आता तरी मुंबईच्या लोकांना थांबवा

निगडी येथे सापडलेला रुग्ण हा मुंबईवरून आला आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांनी मुंबईहून येणाऱ्या लोकांना आता तरी थांबवा. उद्या येथे घरोघरी आरोग्य विभागामार्फत सर्वे केला जाणार असून संपूर्ण गावात औषध फवारणी केली जाणार आहे.

गणेश शिंदे तहसीलदार शिराळा

Post a Comment

0 Comments