BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिरशीत खून;आरोपी फरार

  • शिरशीत खून;आरोपी फरार

शिराळा:  शिरशी (ता.शिराळा) येथीलल बाळु बाबु घाटके (६२ ) रा शिरशी (बादेवाडी) याचा अनैतिक संबंधाच्या संशयावरुन शंकर नाना तटले (५५) याने कुऱ्हाडीने डोक्यात व मानेवर, खांद्यावर वार करून भोसले मळा येथे शिरशी-धामवडे या मुख्यरस्त्यावर खुन केला.

 ही घटना आज सकाळी ११वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत वर्दी मयत बाळू घाटके यांचे नातू राज प्रकाश घाटके याने शिराळा पोलिसात दिली आहे.
 पोलिसातुन समजलेली माहिती अशी मयत बाळू घाटके  हे देवरषी होते.  त्यामुळे त्याच्याकडे आरोपी शंकर तटले यांच्या पत्नीचे वारंवार येणे जाणे होते. त्यामुळे तटले यास अनैतिक संबंधाचा संशय येऊ लागला होता त्यावरून त्याने पत्नीला मारहाण करून घरातून घालवली होती. त्याची दोन मुले बाहेर असल्याने तो एकटाच घरी रहात होता. आज सकाळी मयत बाळू हे घरातून दळण दळण्यासाठी शिरशी या गावात येत होते. दरम्यान संशयित आरोपी शंकर तटले हा गावातून आपल्या शेळ्या घेवून चरावयास भोसले मळ्याकडे निघाला होता. भोसले मळा परिसरात त्या दोघांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी अनैतिक संबंधाच्या रागातून शंकरने बाळूवर हातात असणाऱ्या कुऱ्हाडीने मानेवर, डोक्यावर सपासप वार केले. दरम्यात त्या ठिकाणाहून जवळच असलेल्या भीमराव भोसले यांच्या गारीतील शेणखत  मयत बाळू यांचा नातू राज भरण्यासाठी गेला होता.
त्याच्या सोबत महेश संभाजी घाटके, सुहास सदाशिव शेवाळे,मनोहर भोसले होते. त्यावेळी राज ट्रॅकटर मध्ये शेणखताची पाटी टाकून मागे फिरला असता त्यास गणेश मंडळाच्या शेडकडून मेलो मेलो मला वाचवा असा आवाज आला. त्या ठिकाणी जाऊन त्याने पाहिले असता त्या ठिकाणी बाळू हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले राजने पाहिले.त्या ठिकाणी शंकर तटले यांच्या हातात कुऱ्हाड होती. त्यानं माझ्या आजोबांना का मारता असे त्याने विचारले असता तो त्या ठिकाणाहून न बोलता घाई गडबडीत कुऱ्हाड घेऊन निघून गेला. त्यावेळी बाळू यांना सावरून पाहाले असता ते जागीच ठार झाले होते. त्यानंतर शंकर त्याठिकाणाहुन पसार झाला आहे.
शिराळा पोलिसांनी आरोपीचे शोधासाठी पथक पाठवले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments