शिराळा शहरात मोफत मास्क वाटप प्रसंगी सौ. देवयानी सत्यजित नाईक, सीमा कदम व इतर मान्यवर. |
प्रभाग क्रमांक ६ मध्ये सामाजिक अंतर राखत ८०० मास्कचे वाटप
शिराळा;कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांनी लॉक डाऊनचे नियमित पालन करावे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. मास्कचा नियमित वापर करा असे आवाहन भाजपच्या नगरसेविका सौ.सीमा कदम यांनी केले.कदम यांनी शिराळा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील प्रत्येक घरी, शहरात आवश्यक ठिकाणी गरजूंना व नगरपंचायत मधील सर्व स्वच्छता कामगार यांना जवळपास ८०० मास्कचे मोफत वाटप केले.
यावेळी. देवयानी सत्यजित नाईक , नगरसेविका सौ. नेहाताई सूर्यवंशी, सौ. राजश्री यादव, नगरसेवक श्री. बंडा डांगे, श्री. वैभव गायकवाड, नरेंद्र सूर्यवंशी, प्रदीप कदम, शिवाजी शिंदे, बबलू शेळके, रोहित कदम, दादा शिंदे, प्रकाश शिंदे, मनोज देवळेकर उपस्थित होते.
0 Comments