BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सुमंत महाजन...

विकास शहा

ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुमंत महाजन

उपाध्यक्ष विठ्ठल नलवडे तर सरचिटणीसपदी विकास शहा

          शिराळा:   तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी येथील दैनिक तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी सुमंत महाजन यांची एकमताने निवड झाली. उपाध्यक्षपदी दै पुढारी चे प्रतिनिधी विठ्ठल नलवडे तर सरचिटणीसपदी विकास शहा लोकमत चे प्रतिनिधी विकास शहा यांची निवड झाली.
          शिराळा येथे पत्रकाराच्या बैठकीत दै केसरी चे प्रतिनिधी दिनेश हसबनीस यानी महाजन यांचे नाव सुचवले त्याला सर्वानी मान्यता दिली. यानंतर उपाध्यक्ष, सरचिटणीस निवडी झाल्या कोषाध्यक्ष म्हणून दैनिक केसरी चे दिनेश हसबनीस निवड झाली. या निवडी मावळते अध्यक्ष अजित महाजन अध्यक्षतेखाली झाल्या. सुमंत महाजन हे गेली सदतीस वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करत असुन त्याना लोकमान्य टिळक पुरस्कार, स्वातंत्र्य सैनिक आनंदराव नाईक पुरस्कार, डाॅ.एस.एन.पाटील फाऊंडेशन तुरकवाड़ी इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत..या शिवाय महाजन सहकार क्षेत्रात काम करत आहेत दीनदयाल मागास सहकारी सूतगिरणीचे संचालक, श्री दत्त पत संस्था इस्लामपूर चे संचालक, सांगली अर्बन को आॅप बॅंक शिराळा शाखा चे सल्लागार अध्यक्ष, विवेकानंद कला क्रीडा व सेवा मंडळ चे कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत. या बैठकीस पत्रकार अजित महाजन, रविंद्र कदम, विष्णु माने, चंद्रकांत गुरव, महेश बिळास्कर, राजकुमार पाटील, इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Post a Comment

0 Comments