BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात तीन संस्थात्मक विलगीकरणं कक्ष


शिराळ्यात  तीन संस्थात्मक विलगीकरणं कक्ष

 नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी पी.पी.ई किट 

शिराळा: शिराळा येथे शिवाजीराव देशमुख कॉलेज रेड  व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात  संस्थात्मक विलगीकरणं कक्ष सुरू करण्यात येणार असल्याने शिराळा येथे  विलगीकरणं कक्षांची संख्या तीन होणार आहे. या ठिकाणी तालुक्यातील लोकांना ठेवण्यात येणार आहे.
सध्या आश्रम शाळा शिराळा येथे विलगीकण कक्ष सुरू असून त्या ठिकाणी १४ लोकांना संस्थात्मक विलगीकरणं करण्यात आले आहे.त्यांचे आज आवाहल निगेटिव्ह आले आहेत.  मात्र निगडीच्या त्या कोरोनाग्रस्थानच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे पूर्व नियोजन म्हणून शिराळा औद्योगिक वसाहत येथे ३२ लोकांची व रेड येथील शिवाजीराव देशमुख कॉलेज येथे ५०लोकांच्या विलगीकरणं कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे.त्या नुसार तहसीलदार गणेश शिंदे,गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील ,मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी या दोन्ही ठिकाणची पाहणी केली आहे. त्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व सुविधांचे नियोजन केले आहे. शिराळा शहर व सद्गुरू आश्रम शाळा परिसरात ही औषध फवारणी केली आहे. नगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने त्यांच्यासाठी पी.पी.ई. किट देण्यात आले आहे.एकूण २६ किट उपलब्ध केली आहेत. गरजेनुसार त्यांचा वापर केला जात आहे. सदगुरु आश्रम शाळा येथे विलगीकरणं कक्ष येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पी.पी.ई. किट देण्यात आले आहे.
दिव्यांगाना किट वाटप
  शिराळा शहरातील १२७ दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी  व्यापारी असोसिएशनने ५५, नगरपंचायत बांधकाम सभापती गौतम पोटे १०, बिऊरचे विकास पाटील १०, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील यांनी १० अशा ८५ कीटचे नियोजन झाले आहे. उर्वरित ४२ लोकांना किट देण्यासाठी दानशूर व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन शिराळा नगरपंचायतच्यावतीने करण्यात आले आहे. लॉक डाऊन काळात व्यापारी लोकांचे प्रशासनाला चांगले सहकार्य मिळत आहे.

थेट गुन्हे दाखल करू

शिराळा नगरपंचायतने शिराळा शहर ३०एप्रिल पर्यंत पुर्णतः लॉक डाऊन केले आहे.त्यामुळे जिल्हा बाहेरील लोकांनी शहरात प्रवेश करू नये.प्रवेश केल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील.

 श्रीकांत लाळगे मुख्याधिकारी नगरपंचायत शिराळा

Post a Comment

0 Comments