लॉकडाऊनमुळे त्यांना मिळाले हक्काचे घर
शिवाजीराव चौगुले / शिराळालॉक डाउनच्याकाळात अनेकांना आपला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला आहे. टाईमापस म्हणुन कॅरम,चित्र काढणे, टी.व्ही पहाणे, शेतात काम करणे याकडे अनेकांचा कल वाढला आहे. ज्यांना शेती नाहीत्यांना मात्र आपल्या उपजत कलागुणांना वाव देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आपले टाईमपास आणि इतरांच्या जगण्याची संधी असा दुहेरी संगम उपक्रमशील शिक्षक आष्पाक आत्तार यांनी साधला आहे. त्यांच्या या उपक्रमाने उन्हाळ्यात पक्षांना आपले हक्काचे आणि आकर्षक घर मिळाले आहे.
सतत अंगणात येणारी ,एवढ्याश्या पाण्यात स्नान करणारी आणि वेळप्रसंगी जेवणाच्या ताटा जवळ येऊन बसणारी चिमणी तर अलीकडे गायबच झाली आहे .निसर्ग साखळीत या प्राणी पक्षांचं महत्त्व अनन्य साधारण आहे .त्यामुळे या प्राणी व पक्षांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे .याच उदात्त हेतूने पक्षीमित्र अश्पाक आत्तार यांनी आपल्या इस्लामपूर येथील घराजवळ पक्षांसाठी स्वतः घरटी तयार केली आहेत .उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे .मानवासह पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे .या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी पक्षांचा मृत्यू दरही वाढतच असतो .अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे .या घरटयांवर
- पक्षी वाचवा निसर्ग वाचवा,
- पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण,
- चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये एक पक्षी की जान बचाएं ,
- पक्षी है खेतों की शान ,
- जीवन में एक नियम बनाओ पक्षीयोंको घर का सदस्य बनाओ
- पक्षी बचाव जीवन बचाव
असे एक ना अनेक शुभ संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या या शुभ संदेशामुळे घरटेही आकर्षक दिसत आहेत.शिवाच्या रंगीबिरंगी घरटयांमुळे त्यांच्या अंगणामध्ये पक्ष्यांचा राबता वाढला असून किलबिलाट सुरू झाला आहे .
वेगवेगळ्या फळांसह फुलझाडांचा ही त्यांच्या अंगणामध्ये समावेश आहे .त्यामुळे दिवसभर हे पक्षी या फळ आणि फुल झाडांवर विसावलेले असतात .त्यांच्या पत्नी गुलजार आत्तार या देखील अंगणामध्ये दररोज सकाळी धान्याची रांगोळी काढून पक्षांच्या घासाची तजवीज करत आहेत . मातीच्या भांड्यात पाणीही ठेवले जात आहे त्यामुळे चिमणी सह लाल बुडाचा पक्षी ,कबुतर कोकीळ या पक्षांचा सध्या येथे राबता आहे .या पक्षांच्या सुरेल किलबिलाटामुळे वातावरणही अल्हादायक बनत आहे .
त्यांनी यापूर्वी निसर्ग आणि पर्यावरण जनजागृतीसाठी झाडांवर सुंदर हस्ताक्षर मध्ये बोध वाक्य लिहून झाडांनाच बोलके केले होते . त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अनुकरणही केले .
पक्षांसाठीही वाटीभर पाणी मूठभर धान्य अंगणात ठेऊन तसेच घरटी बनऊन पक्षी वाचवा निसर्ग वाचवा असा शुभ संदेश त्यांनी दिला आहे.
बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर , मोबाईलचे टॉवर , रेंज यामुळे चिमण्यांसह अनेक पक्षांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत.वाढत्या शहरीकरणामुळे पक्षांना घरटी करण्यास जागा उपलब्ध होत नाही .परिणामी ते मानवापासून दूर जाऊ लागले आहेत .निसर्गाशिवाय वृक्षारोपणात या पक्षांचं महत्त्व आहे .त्यामुळे या पक्षांसाठी अंगणात गच्चीवर घरटे बांधून शिवाय थोडं अन्न पाणी ठेवून या चिमण्यांसह पक्षांची संख्या वाढवता येईल .शिवाय मुलांमध्येही आवड निर्माण होऊन त्यांच्याकडून निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न होईल. आष्पाक आत्तार
0 Comments