कोरोनाच्या पार्श्वभूमीवर : वयोवृध्द व गंभीर आजार असलेल्यांची आरोग्य तपासणी मोहिम आठवडाभर राबविणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
क्वारंटाईनची सुविधा वाढविण्यावरही भर
क्वारंटाईनची सुविधा वाढविण्यावरही भर
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : जगभरात वयोवृध्द व पुर्वीचे काही गंभीर आजार असलेल्याना कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अधिक गंभीर होत असल्याचे अधोरेखित आहे त्यामुळे साठ वर्षावरील नागरिक तसेच मधुमेह, हापर टेन्शन, ह्रदयविकार असे पहिल्यापासून आजार असणाऱ्या नागरिकांचा घरोघरी सर्व्हे करुन त्यांचे स्क्रिनिंग करुन आरोग्य पथकांमार्फत तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
साठ वर्षावरील नागरिक तसेच मधुमेह, हापर टेन्शन, ह्रदयविकार असे पहिल्यापासून आजार असणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन ज्यांना काही त्रास आहे अशा लोकांना तात्काळ फिवर क्लिनिककडे संदर्भीत करण्यात येणार आहे. फिवर क्लिनिकमध्ये अशा लोकांना पुढील तपासणीची आवश्यकता अधोरेखित झाल्यास, मुंबईशी कोणत्याही कारणाने संबध असल्यास अथवा सारी ची लक्षणे असल्यास तपासणी वरिष्ठस्तरावर पाठविण्यात येईल. अशा लोकांमध्ये लवकर लक्षणे आढळल्यास आपण त्यांच्यावर त्वरीत उपचार करु शकतो व पुढील धोका टाळू शकतो यासाठी संपुर्ण आठवडाभर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. अशा लोकांनी त्यांच्या भागात येणाऱ्या आरोग्य पथकांना स्वत:पुढे येऊन माहिती द्यावी, कोणीही घाबरु नये. याचा फायदाच नागरिकांना होणार आहे. याचा मोठ्याप्रमाणावर लाभ घ्यावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्याआढत सध्या 8 हजार बेडची उपलब्ध ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊन संदर्भात शासनस्तरावर जो निर्णय होईल त्या प्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार असून येत्या काळात अंतरराज्य अथवा राज्यांतर्गत हालचालीस परवानगी दिल्यास अशा प्रवास करणाऱ्या लोकांना क्वारंटाईमध्ये ठेवणे शक्य व्हावे यासाठी जिल्ह्यातील क्वारंटाईन सुविधा वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक तालुकास्तरावर किमान पाचशे व जिल्हास्तरावर एक हजार ते दिड हजार बेडची सुविधा वाढविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात परत आलेल्या ऊस तोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी निर्देश देण्यात आले असून आरोग्य तपासणी सुरु ही झाली आहे. तसेच परजिल्ह्यात ऊसतोड कामगारांना त्यांच्या मुळ जिल्ह्यात सोडून आलेल्या स्थानिक वाहनचालकांचीही आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
0 Comments