BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

'कोरोना'ला गांभीर्याने घ्या- आमदार मानसिंगराव नाईक


बेरडेवाडी (ता. शिराळा) येथे 'कोरोना'बाबत संपर्क दौऱ्यात बोलताना आमदार मानसिंगराव नाईक

 'कोरोना'ला गांभीर्याने घ्या- आमदार मानसिंगराव नाईक 
शिराळा  : 'कोरोना'ला गांभीर्याने घ्या, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
भाष्टेवाडी, बेरडेवाडी, मिरूखेवाडी, धनगरवाडा व विनोबाग्राम (ता. शिराळा) येथील  संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते. 'विश्वास'चे संचालक शिवाजी पाटील, सावळा पाटील, तानाजी व रवी भाष्टे, तानाजी पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार नाईक म्हणाले, कोरोना विषाणू भयंकर आहे. त्याच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगावर संकट आले आहे. त्यामुळे त्याबाबत गांभीर्य बाळगणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये परगावाहून आलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. गावात कोणी अनोळखी इसम फिरत असल्या त्याची कल्पना आरोग्य विभागास द्यावी. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना व नियमांचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने घरी सुरक्षित राहावे. आपल्या कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्यावी.
भाष्टेवाडी येथे राजेश धामणकर, रवी भाष्टे, तानाजी भाष्टे, उपसरपंच तानाजी पाटील, प्रकाश धामणकर, बेरडेवाडी प्रकाश बेरडे, महेश बेरडे, शंकर बेरडे, लक्ष्मण बेरडे, रामचंद्र बेरडे, आनंदा बेरडे, मिरूखेवाडी येथे नामदेव मिरुखे, तानाजी मिरुखे, विठ्ठल मिरुखे, सावळा पाटील, बाळासाहेब मिरुखे, गणेश कंधारे, धनगरवाडा येथे तुकराम डोईफोडे, विनोबाग्राम येथे तानाजी बईकर उपस्थित होते.
……………………………

Post a Comment

0 Comments