BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डेचे पाणी मानकरवाडी तलावात

वाकुर्डे:करमजाई तलावातुन गेटद्वारे कालव्यातून मानकरवाडी तलावात सोडण्यात आलेले पाणी.

वाकुर्डेचे पाणी मानकरवाडी तलावात



शिराळा: वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी करमजाई तलावातून मानकरवाडी तलावात  कालव्यातुन पाणी सोडण्यात आले .

शिराळा तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक तलाव व धरणांच्या पाणी साठ्यात घट होऊ लागली आहे. मानकरवाडी तलावातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने या परिसरात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. त्यामुळे वाकुर्डे योजनेचे पाणी या तलावात सोडावे अशी मागणी लोकांनी आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्याकडे केली होती.त्यानुसार वाकुर्डे योजना सुरू करून करमजाई तलाव भरण्यात आला. हा तलाव भरल्यानंतर कालव्याद्वारे पाणी मानकरवाडी तलावात सोडण्यात आले आहे .या तलावात पाणी आल्यामुळे मानकरवाडी, आंबेवाडी, शिरसी, अंत्री या परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments