इनामवाडीत घराला आग;एक लाखाचे नुकसान
शिराळा, ता.२५: इनामवाडी (ता.शिराळा )येथील प्रकाश नामदेव चव्हाण व विकास नामदेव चव्हाण यांच्या घर व जनावरांच्या शेडला शॉर्ट सर्किटने आग लागून एक लाख ८७५ नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना आज सकाळी ९वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी प्रकाश नामदेव चव्हाण व विकास नामदेव चव्हाण यांचे तीन आखणीचे घर आहे. त्यास लागून जनावरांचे शेड आहे. सकळी ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली.ही शेड मध्ये गवत असल्याने आगीने भडका घेतला. धुराचे लोट वाहू लागल्याने.आग लागल्याचे दिसताच घरातील लोकांनी आरडाओरडा केला.त्यावेळी वाडीतील संदीप चव्हाण, नागेश चव्हाण, जोती चौगुले,प्रकाश पाटील,हरेश चौगुले, संजय चव्हाण, संतोष चव्हाण, सचिन चव्हाण, संजय पाटील,राहुल चौगुले, सौरभ चौगुले, सचिन पाटील,संजय घोडवील या तरुणाच्या सह ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी एकत्रित येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.आग विझवण्यासाठी पाणी नसल्याने लोकांनी आपापल्या घरात साठवून ठेवलेले पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. विद्युत पंपाची लाईट नसल्याने विद्युतमोटार सुरू करता आली नाही. वाडीतील घरातील पाणी संपल्याने निनाई देवी दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी साखर कारखान्याच्या टँकर ने पाणी आणून दोन तासांच्या अथक प्रत्यनाने आग आटोक्यात आणली. ही आग वेळीच आटोक्यता आणली नसती तर आजूबाजूला घरे होती.ती जळून खाक झाली असती. या आगीत कौले,रिपा,वासे, गवत,धान्य जाळून खाक झाले असून पत्र्याचे नुकसान झाले आहे. प्रकाश यांचे ४९०५० व विकास यांचे ५१०८२५ असे एकूण एक लाख ८७५ रुपये नुकसान झाले आहे. पंचनामा तलाठी मोहन शिरसे,उपसरपंच सदाजी पाटील,ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ बडडे, विश्वजित पोतदार, विश्वनाथ देशपांडे यांनी केला.
0 Comments