अन् त्यांना गावी येणं पडलं महागात
शिराळा; मुंबई, पुणे अथवा बाहेरील जिल्ह्यातून शिराळा पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणार असल्याचा इशारा शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिला आहे..यावेळी पाटील म्हणाले,पोलीस अधिक्षक सांगली व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्यात संचार बंदी लागु केली आहे. अत्यावश्यक व गरजेच्या सेवा वगळता बाहेरुन मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातुन येणा-या लोकांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सांगली यांनी कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश बंदीचा आदेश दिला आहे. त्यानुसार शिराळा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करुन सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने सर्व लोकांना आहे त्याच ठिकाणी थांबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. राज्यांमध्ये संचारबंदी लागू केली असून संचार बंदीचे उल्लंघन करणा-या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना इन्स्टिट्यूशन काॉरेनटाईन करण्यात येईल. यापुढे प्रत्येक नागरिकांनी बाहेरगावावरून येणार्या लोकांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन करून त्यांना आपल्या गावामध्ये येण्यापासून रोखावे व संभाव्य धोका टाळावा.
0 Comments