BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शंकर यास ३०एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी



शंकर यास ३०एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

शिराळा: शिरशी (ता.शिराळा) येथील बाळु बाबु घाटके याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी शंकर नाना तटले यास  न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.त्याच्याकडून खूनात वापरलेली कुर्‍हाड व कपडे जप्त केले आहेत.
खून करून फरारी झालेल्या शंकर यास रविवारी शिरशी येथे अटक केली होती. आरोपी शंकर तटले याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून गावातील बाळू घाटके याचा भर दिवसा रस्त्यावर शनिवारी खून केला होता. या बाबत
 मयत बाळू घाटके यांचे नातू राज प्रकाश घाटके याने शिराळा पोलिसात वर्दी दिली होती.
  मयत बाळू घाटके  हे देवरषी होते.  त्याच्याकडे आरोपी शंकर तटले यांच्या पत्नीचे वारंवार येणे जाणे होते. त्यामुळे तटले यास अनैतिक संबंधाचा संशय आला होता. त्यावरून त्याने पत्नीला मारहाण करून घरातून घालवली आहे. त्या संशयातून त्याने समोर बाळू दिसताच त्याचा काटा काढून पसार झाला होता. त्याच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या  चार पथके ग्रामस्थांच्या मदतीने दोन दिवस शिरशी व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला होता.अखरे रविवारी त्यास सव्वा चार वाजता शिरशीच्या लांडगडगा दरा येथे झुडपात लपून बसलेला असताना अटक होती.

Post a Comment

0 Comments