BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे नानासाहेब महाडिक यांना विनम्र अभिवादन

नानासाहेब महाडिक संपूर्ण जिल्ह्याला कुटुंब मानून आयुष्यभर काम करत राहिले. त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात दिलेले योगदान जिल्हा कधीही विसरणार नाही असे मत नगरसेवक केदार नलवडे यांनी व्यक्त केले.


शिराळा येथे नानासाहेब महाडिक यांना विनम्र अभिवादन

शिराळा,ता.३०:नानासाहेब महाडिक संपूर्ण जिल्ह्याला कुटुंब मानून आयुष्यभर काम करत राहिले. त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात दिलेले योगदान जिल्हा कधीही विसरणार नाही असे मत नगरसेवक केदार नलवडे यांनी व्यक्त केले.
येथील स्व. वनश्री नानासाहेब महाडिक को - ऑप क्रेडिट सोसायटी शाखा शिराळा मध्ये प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन प्रसंगी बोलत होते.
यावेळी नलवडे म्हणाले, नानासाहेबांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत केली. चांगल्या साठी चांगले तर अन्याय करणाऱ्या विरोधात ते सर्व सामान्य लोकांच्या मागे उभे राहत होते. सांगली जिल्हा बरोबरच कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात ही त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संपूर्ण जिल्ह्याला कुटुंब मानून आयुष्यभर काम केले. वेकंटेश्र्वरा शिक्षण संस्था, सहकारी पतसंस्था या बरोबर त्यांनी उभा केलेले उद्योग व्यवसाय यातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांच्या अकाली निधनाने मोठी हानी झाली असून त्यांनी घालून दिलेल्या वैचारिक आदर्शावर आमची वाटचाल सुरू आहे.
  यावेळी नगरसेवक केदार नलावडे, राम जाधव, मॅनेजर दिपक जधव, बाजीराव नलावडे,विजय पोटे,सचिन दिवटे,सौरभ नलावडे,अभिनव नलावडे, अशोक सवाईराम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments