BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निगडीत ते १९जण निगेटिव्ह; आज २४ जणांचे स्वॅब मिरजेला पाठवले


निगडीत ते १९जण निगेटिव्ह; आज नवीन २४ जणांचे स्वॅब मिरजेला पाठवून त्यांना ठेवले शिराळा येथील संस्थात्मक विलगीकरणं कक्षात

शिराळा:निगडी (ता.शिराळा) येथील त्या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १९ जणांचा अवाहल निगेटीव्ह आला आहे.त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या  इतर २४ जणांचे स्वॅब आज मिरज येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहाच्या संस्थात्मक विलगीकरणं कक्षात ठेवण्यात आले आहे.

अस्वलवाडी येथील व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला असून काळुंद्रे  येथील व्यक्तीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
त्या तरुणी बरोबर तिच्या घरातील महिला पॉझिटिव्ह आल्याने निगडित कोरोना बधितांची संख्या दोन झाली आहे. निगडीत गेले तीन दिवसांपासून आरोग्य यंत्रणा सतर्क असून ४८७ कुटुंबातील १४८५ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.  गेले दोन दिवसांपासून निगडी गाव पुर्णतः लॉक डाऊन आहे.गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यां कोरोना बाधित महिलांच्या संपर्कात आणखी कोणी बाहेरील व्यक्ती आहेत का याची चौकशी सुरू आहे. सदगुरु आश्रम शाळेत शनिवारी विलगीकरण करण्यात आलेल्या १४जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्या १४जणांना व आजच्या २४ आशा ३८ जणांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे
निगडी च्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या गावांनी बाहेरील भाजीपाला विक्रेते व इतर लोकांना गाव बंदी केली आहे. औंढी येथे दोन विलगीकरणं कक्ष उभारण्यात आले असून धूर व औषध फवारणी करण्यात आली आहे.

ते चार आरोग्य कर्मचारी निगेटिव्ह

निगडी येथील त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार आरोग्य कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.निगडिततील सर्व्हे पूर्ण झाला आहे. गावात फक्त एक रुग्ण किरकोळ आजारी आहे.
डॉ.प्रवीण पाटील तालुका आरोग्य अधिकारी

शिरशी १००% लॉक डाऊन

निगडी येथे कोरोना रुग्ण आढल्याले खबरदारी म्हणून शिरशी ग्रामस्थांनी तीन दिवस १००% लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायतने गावात तिसऱ्यांदा औषध फवारणी केली आहे.

Post a Comment

0 Comments