BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगलेत नव्याने बांधलेल्या कोल्हापुरी बंधा-यात पाणी साठल्याने शेतकरी समाधानी

 सरकार बाग मांगले येथील नव्याने बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात आलेले वाकुर्डे योजनेचे पाणी.

मांगलेत नव्याने बांधलेल्या कोल्हापुरी बंधा-यात पाणी साठल्याने  शेतकरी समाधानी


शिराळा:  मांगले (ता. शिराळा ) येथील सरकार बाग या ठिकाणी मोरणा नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा  बांधून पूर्ण झाला असून यामध्ये पाणी साठल्याने  येथील शेतकरी समाधानी असल्याची माहिता माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिली.
यावेळी नाईक म्हणाले, वारणा व मोरणा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणावर शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तालुक्याच्या उत्तर विभागांमधील मोरणा नदीमध्ये वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी उपलब्ध झाल्याने ही नदी बारमाही प्रवाहित झाली आहे. मोरणा नदीवर वाकुर्डे येथे करमजाई व शिराळा येथे मोरणा मध्यम प्रकल्प यामुळे पाणी अडवण्याची सोय बऱ्यापैकी झाली आहे. या दोन्ही धरणामधून कालव्या मार्फत पाणी देण्याची सोय नसल्याने नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी दोन्हीकडच्या शेतकऱ्यांना विद्युत पंपा मार्फत आपल्या शेतीला द्यावे लागत आहे. नदीमधून वाहत जाणारे पाणी संबंधित शेतकऱ्यांना त्या-त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे म्हणून मोरणा नदीवर यापूर्वी अंत्री खुर्द, बिरोबा मंदिर शिराळा, प्राध्यापक कॉलनी शिराळा, नाव डोह मांगले या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यातील पाण्याचा वापर शेतीसाठी चांगल्या प्रमाणात होत आहे.
मांगले गावच्या नजीक एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व्हावा म्हणून स्थानिक शेतकऱ्यांची वारंवार मागणी होती. त्यानुसार  बंधाऱ्यास सुमारे ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन हे काम पुर्ण झाले आहे.
 शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन या बंधाऱ्याचे काम अल्प काळामध्ये चांगल्या प्रकारे व दर्जेदारपणे पूर्ण केले आहे. नुकतेच वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा मध्यम प्रकल्पांमधून मोरणा नदीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या सदर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात हे पाणी आले आहे. त्यामुळे या ठिकाणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा उपलब्ध झाला आहे. ऐन उन्हाळ्यात नदीमध्ये पाणी उपलब्ध झाल्याने मांगले व लादेवाडी येथील दोन गावचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुलभ होणार आहे .

Post a Comment

0 Comments