BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

देव ऊठवल्याच्या अंधश्रद्धेतून कांदे येथे खून


देव ऊठवल्याच्या अंधश्रद्धेतून कांदे येथे  खून

शिराळा,ता.२९ ः आपल्या घराच्या नावाने देव उठवलाय आणि त्यामुळेच आपल्या घरात भांडणे होत आहेत, अशा अंधश्रद्धेतून कांदे (ता.शिराळा ) येथील तुकाराम मारुती कुंभार (वय ६५) यांच्या डोक्यात कुदळ घालून संशयित आरोपी  राहूल बाळासाहेब कुंभार (वय ३५)  याने चुलत काकांचा खून केला. या प्रकरणी त्यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तो मनोरुग्ण वाटत असल्याने  त्याची मिरज येथे वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
ही घटना मंगळवारी दुपार नंतर घडली.याबाबत मयत तुकाराम कुंभार यांची सून गीतांजली किरण कुंभार(वय २९)  यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसातून व घटनास्थळा वरून समजलेली माहिती अशी, तुकाराम कुंभार हे चिखली येथील खाजगी नर्सरीत कामाला  होते मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे साडे आठ वाजता कामाला गेले.सायंकाळी सहाला ते घरी परत यायचे. परंतु मंगळवारी सात वाजले तरी परतले नाहीत . म्हणून कामाच्या ठिकाणी चौकशी  केली.त्यावेळी तुकाराम यांना राहुल तुमच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाल्याचे सांगून त्यांना मोटर सायकलवरून दुपारी १२वाजण्याच्या सुमारास घेऊ गेल्याची माहिती दिली. राहुलच्या घरी  चौकशी केली असता.तो घरी नसल्याचे घरच्यांनी सांगीतले. त्यावेळी गावातील व शेजारी राहणाऱ्या लोकांनी तुकाराम यांचा नर्सरी,शेतात,गावात शोध घेण्यास सुरुवात केली.त्यावेळी चिखली-कांदे रस्त्यावरील कुंभारमळा येथील ओढ्या जवळील उसाच्या शेतात तुकाराम रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांच्या डोक्यावर मारहाणीच्या मोठ्या जखमा होत्या. त्यांचा मृत्यु झाला होता.
त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.संशयित राहुल कुंभार यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

त्याच्या डोक्यात खुनाचे चक्र सुरू होते.

राहुल हा दोन दिवसांपासून तुकाराम यांना शेतात पाणी बघायला चला असे वारंवार म्हणत होता. पण ते गेले नाहीत. काल राहुलने त्यांना फसवून त्यांचा काटा काढला.

बोलला ते करून दाखवले

राहुल हा तापट स्वभावाचा होता.तो काम करत नसल्याने त्याच्या कुटुंबात नेहमी वाद होत असे. त्या वादाचा आळ तुकाराम यांच्या कुटुंबावर घालत होता.त्यांनी आपल्या घरावर देव घातल्याचा संशय  त्याच्या मनातुन जात नव्हता. त्यामुळे त्याने मागील सहा महिन्या पासून तुम्ही देव घातल्याने मला त्रास होत आहे. आमच्या घरात भांडणे लागत आहे.त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी तो देत होता.

लॉक डाऊन मुळे चिमुकल्या नातवाने केले आजोबांचे अंत्यसंस्कार.

तुकाराम यांचा किरण हा एकुलता एक मुलगा. तो पंजाब मध्ये भटिंडा येथे सैन्य दलात कार्यरत आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने त्यास वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी येता आले नाही. त्यामुळे त्याचा सहा वर्षाचा मुलगा शुभम याने आजोबावर अंत्यसंस्कार केले.
त्याच्या भावाने ही आत्महत्या केली होती.
राहुलच्या लहान भावाने आठ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.त्यामुळे घरची जबादारी राहुलवर होती.आता तो ही खुनात अडकला. त्यामुळे घरची जबादारी आता वृद्ध आईवडीलावर आली आहे.
चौकट-संशयाच्या भोवऱ्याने तालुक्यात चार दिवसात दुसरा खून
शिरशी येथे शनिवारी ही पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरुन बाळू घाटके याचा शंकर तटले यांनी कुऱ्हाडीने खून केला. कारण बाळू हा देवर्षी असल्याने त्यांच्या पत्नीचे त्याच्याकडे जाणे येणे होते.  त्याच संशयाने शंकराने बाळूला संपवले.त्यानंतर देव उठवल्याच्या अंधश्रद्धेच्या संशयाने चौथ्या दिवशी राहुलने  तुकारामला संपवले. चार दिवसात दोना खून झाल्याने तालुका हादरला आहे.

पोलीस यंत्रणेचा ताण वाढला.

कोरोनामुळे संचार बंदीचा तणाव,त्यात निगडी येथे कोरोना रुग्ण सापडल्याने त्या ठिकाणी असणारा बंदोबस्त. त्यात तालुक्यात खून सत्र सुरू झाल्याने पोलीस यंत्रणेवरील दिवसेंदिवस ताण वाढू लागला आहे.त्यांना या आठवड्यात पुरेशी विश्रांती मिळालेली नाही.


Post a Comment

0 Comments