BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिरशीच्या खुनी आरोपीस अटक





शिरशीच्या खुनी आरोपीस अटक

शिराळा: शिरशी (ता.शिराळा) येथील बाळु बाबु घाटके याच्या खून प्रकरणातील फरारी असलेल्या संशयित आरोपी शंकर नाना तटले यास शिराळा पोलिसांनी २४ तासात अटक केली.

 आरोपी शंकर तटले याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून गावातील बाळू घाटके याचा भर दिवसा रस्त्यावर शनिवारी खून केला होता.
या बाबत मयत बाळू घाटके यांचे नातू राज प्रकाश घाटके याने शिराळा पोलिसात वर्दी दिली होती.
  मयत बाळू घाटके  हे देवरषी होते.  त्याच्याकडे आरोपी शंकर तटले यांच्या पत्नीचे वारंवार येणे जाणे होते. त्यामुळे तटले यास अनैतिक संबंधाचा संशय आला होता. त्यावरून त्याने पत्नीला मारहाण करून घरातून घालवली आहे. त्या संशयातून त्याने समोर बाळू दिसताच त्याचा काटा काढून पसार झाला होता. त्याच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या  चार पथके ग्रामस्थांच्या मदतीने दोन दिवस शिरशी व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला होता.अखरे आज त्यास सव्वा चार वाजता शिरशीच्या लांडगडगा दरा येथे झुडपात लपून बसलेला २४ तासात पकडला.
   आरोपीस पकडण्यात सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहा पोलीस फौजदार गणेश झांझरे, हवालदार कालिदास गावडे, शिवाजी पाटील, भाऊसाहेब कुंभार, महेश साळुंखे, पोलिस नाईक विनोद पाटील, संदीप पाटील धनाजी नायकल, दीपक हांडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार, नितीन घोरपडे, रणजीत ठोमके, धनंजय नलवडे यांच्या पथकाला यश आले.

Post a Comment

0 Comments