BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निगडीत कोरोना रूग्णांची संख्या दोन



निगडीत कोरोन रुग्णांची संख्या दोन

शिराळा: निगडी (ता.शिराळा ) येथील त्या कोरोना बाधित तरुणीच्या चुलत भाऊ व संपर्कातील इतर चार जण आणि सागावच्या त्या दोघांचा अहवाल निगेटिव्ह तर चुलतीचा पॉझिटिव्ह आला आहे. मात्र निगडीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून तालुका  पुर्णतःलॉक डाऊन करण्याच्या विचारात प्रशासन आहे. सांगली जिल्ह्यात कासेगाव व कामेरी येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या गावात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
 अस्वलेवाडी येथील एकास मिरज येथे पाठवण्यात आले असून त्याचे  व शिराळा येथे निगडी येथील विलागीकरण कक्षात असणाऱ्या १४ जणांचे  स्वॅब मिरज येथे पाठवण्यात आले आहेत. काळुंद्रे येथील एकास मिरज येथे पाठवण्यात आले आहे.
 निगडी गावातील १४८५ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात सुरू आहे. आरोग्य खात्याच्या १२ टिम तयार केल्या असून आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक,परिचारिका २ वैद्यकीय अधिकारी, ४ सुपरवायझर यांचा समावेश आहे. निगडी गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. २०० मिटर कंटेनंट झोन तयार करण्यात आला असून संपूर्ण गावात संचार बंदी लागु करण्यात आली आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.कोरोना बाधित व्यक्तींच्या सहवासात कोण कोणत्या व्यक्ती आल्या आहेत यांचा तपास सुरू आहे. गावात कडक पोलीस बंदोबस्त असल्याने सर्व लोक घरात आहेत.त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाच रस्त्यावर दिसत आहे. निगडीत सर्वत्र शांतता दिसून येत आहे. इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
कासेगाव आणि कामेरी या गावचे हे दोघे रुग्ण आहेत. हे दोघेही कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहेत.
निगडीच्या पार्श्वभूमीवर आमदार मानसिंगराव नाईक,तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, शिराळा नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी बैठक झाली.त्यात शिराळाशहर ३० एप्रिल पर्यंत  दूध, हॉस्पिटल व मेडिकल वगळता इतर सर्व सेवा पूर्णतः बंद ठेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिराळा शहर ३० एप्रिल पर्यत लॉक डाऊन 

निगडी येथे रुग्ण सापडल्याने शिराळा शहर फक्त वैद्यकीय सेवा वगळता  इतर सर्व अत्यावश्यक सेवा ३०एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात  येणार आहे.बिऊर नाका, इस्लामपूर रोड, पाडळी नका व करमाळे रस्ता या चार ठिकाणी चेक पोस्ट ठेवण्यात आले आहेत. संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई केली जाईल.
श्रीकांत लाळगे (मुख्याधिकारी नगरपंचायत शिराळा)

तालुका तीन दिवस लॉक डाऊनचा विचार

निगडी येथे रुग्ण सापडला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तीन दिवस तालुका पुर्णतः लॉक डाऊन करण्याचा विचार सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. निगडी गाव बाहेरील एक किलोमीटर पर्यंतचा परिसर लॉक केला असून त्या लोकांची दररोज तपासणी केली जाणार आहे.त्यांना अत्यावश्यक सेवा घरीच देण्यात येणार आहेत.
गणेश शिंदे तहसीलदार 

Post a Comment

0 Comments