BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विना मास्क व विनाकारण फिरणे; ५०हजार दंड वसूल


विना मास्क व विनाकारण फिरणे; ५०हजार दंड वसूल

शिराळा: शिराळा येथे व परिसरात विना मास्क व विनाकारण फिरल्या प्रकरणी २०गुन्हे दाखल करून ५० लोकांच्याकडुन न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक हजार असा एकूण ५०हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉक डाऊन काळात शिराळा व परिसरात विना कारण व  मास्क शिवाय फिरताना  ५० लोक आढळून आले. त्यांना  न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी एक हजार रुपये असा एकूण ५० हजार रुपये दंड न्यायालयाने वसूल करून घेतला आहे.
     कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणे कामे कोणीही विनाकारण घरातून पडू नये.अति महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. यापुढे कोणी विना मास्क घरातून बाहेर पडली तर किंवा अतिमहत्वाच्या कामाशिवाय घरातून मोटरसायकल किंवा वाहन देऊन बाहेर पडले तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments