BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पेरूचे आमिष दाखवून अल्पवयीनवर बलात्कार


पेरूचे आमिष दाखवून अल्पवयीनवर बलात्कार


शिराळ: येथील नवजीवन वसाहतीतील बाजीराव उर्फ पिंटू बबन लोंढे (वय ३८) यास घराजवळील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पेरुचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ही घटना घटना आज शुक्रवार (ता.२४) रोजी सकाळी साडे अकरा च्या दरम्यान घडली.
     याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, संशयित बाजीराव याने सदर अल्पवयीन मुलीस पेरू काढून देतो असे आमिष दाखवून घराजवळील गवतात नेऊन बलात्कार केला. दोन महिन्यांपूर्वी ही असेच आमिष दाखवून शेतात नेऊन बलात्कार केला होता. आज ही माहिती तिने आपल्या आईला सांगितली.यानंतर याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
  पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा,  अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संचारबंदी या अनुशंगाने इस्लामपूर विभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , शिराळा येथील नवजीवन वसाहत झोपडपट्टी मधील एका पीडित मुलीवर बाल लैंगिक अत्याचार झाला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर  नंतर   स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक अंतम खाडे , पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे , हवालदार जयप्रकाश उथळे , पोलीस हवालदार सुनील चौधरी , पोलीस नाईक सचिन धोत्रे , कुबेर खोत , चेतन महाजन ,  सचिन कनप सलमान मुलानी यांनी  बाजीराव बबन लोंढे (वय ३८)  यास तात्काळ ताब्यात घेतले.
   पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments