BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाढदिवसाच्या निमित्ताने गरजुंना जीवनावश्यक वस्तू वाटप

 वाढदिवसाच्या निमित्ताने  ११ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना  पोलीस उपनिरीक्षक सुप्रीया दुरंदे सोबत  पोलीस हवालदार कालिदास गावडे, पोलिस नाईक संदीप पाटील, पोलिस हवलदार धनंजय नलवडे 

वाढदिवसाच्या निमित्ताने  गरजुंना जीवनावश्यक वस्तू वाटप

.
शिराळा :येथील शिराळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सूप्रिया दुरंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वायफळ खर्चाला फाटा देत गरीब व गरजु ११ कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
खरं तर पोलीस म्हटलं तर अनेकांना घाम फुटल्याशिवाय रहात नाही. त्यांच्या बद्दल चांगले बोलणारे कमीच आहेत. काहींच्या वागण्याचा त्रास हा सर्व सामांन्य लोकांना होतो. हे नाकारुन चालणार नाही.पण सर्वच तसे असतात असे नाही. सध्याची कोरोनाची परिस्थीती पाहता लोकांचा जीव वाचवण्यासाठी  खाकीवर्दी आपल्या जीवाची व कुटुबाची पर्वा न करता रात्रंदिवस आपण खरी सुखी रहावे म्हणुन रस्त्यावर उभी आहे. वेळे नुसार काही वेळा हाताता दांडके घेवुन कारवाई करणारे पाहिलेत. त्याच प्रमाणे वेळ प्रसंगी उपवाशी व अडचणीत असणा-यांना स्वखर्चाने मदत करणारे पाहुिले आहेत. त्याचीच प्रचिती आज शिराळा येथे आली. बंदोबस्ताचा ताणतणावात ही आपला वाढदिवस गोरगरीबांच्या चेह-यावर हाश्य आणुन  पोलीस उपनिरीक्षक सूप्रिया दुरंदे यांनी साजरा केला. गोरगरीबांच्याकडुन त्यांनी आशिर्वादाची भेट मिळाली.
आज बुधवारी  दुरंदे यांचा  वाढदिवस होता. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून नागरिकांच्या सोयी साठी आपला जीव धोक्यात घालून पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. कामाचा व्याप सांभाळून माणुसकीचा झरा कायम ठेवत ही मंडळी काम करत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना  दुरंदे यांनी आपले कर्तव्य बजावत शिराळा उत्तर विभागात शिरशी,गिरजवडे,धामवडे,पाचुंब्री,कोंडाईवाडी या गावातील 11 गरजु व गरीब कुटुंबाला  अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.  यावेळी पोलीस हवालदार कालिदास गावडे, पोलिस नाईक संदीप पाटील, पोलिस हवलदार धनंजय नलवडे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments