BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यात ३०जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


त्या ३०जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

 खेराडे वांगी (ता. कडेगाव) येथील त्या 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलाआहे.

मुंबई येथे मृत्यू झालेल्या  व्यक्तीचे खेराडे वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते . सदरची व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह असल्याचे कळाल्यानंतर प्रशासनाने सदर व्यक्तीशी संबंधित 30 व्यक्तींना कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवले. होते या व्यक्तींची कोरोणा चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
खेराडे वांगी गावातील एकजण मुंबई येथील एका हॉस्पिटल मध्ये ह्रदयाच्या उपचारासाठी 17 एप्रिल रोजी दाखल झाले होते.18 एप्रिल राजी त्यांचे निधन झाले.त्यानंतर संबंधितांच्या पत्नींने त्याचदिवशी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचा मृतदेह मुंबईहून रुग्ण वाहिकेतून खेराडे-वांगी येथे आणला. नातेवाईकांनी  मृतदेहावर 19 एप्रिलला अंत्यसंस्कार केले. बुधवारी (ता.22) दुपारी मयतच्या पत्नीने मुंबईतील संबंधित हॉस्पिटलमध्ये फोन माहिती घेतली असता मयत पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याचे समजले होते.

Post a Comment

0 Comments