BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या चार गावात झाले गव्याचे दर्शन

शिराळा, चिखलवाडी पवारवाडी, शिंगटेवाडीत गव्याचे दर्शन

शिराळा,ता.३०: शिराळा येथील खेड फाट्याजवळ व चिखलवाडी,पवारवाडी, शिंगटेवाडी येथे गव्या रेड्याचे शेतक-याना दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
       बुधवार २९ रोजी रात्री १:३० च्या दरम्यान खेड फाट्यावर काहीवेळ थांबला असताना प्लॅनेट अर्थ फौंडेशन चे सदस्य दत्ता भांडवले यांनी पाहिले. याचे व्हिडिओ शूटिंग ही त्यांनी केले आहे.याची माहिती फौंडेशन चे अध्यक्ष आकाश पाटील यांना दिली असून या फौंडेशन चे प्रणव महाजन व सदस्य या गव्याचा माग काढत आहेत. यानंतर हा गवा रेडा डांगे गल्ली , पवळ गल्लीतून गेला. याठिकाणी मक्याच्या पिकाचे नुकसान केले आहे.
आज गुरुवारी रात्री १० वाजता चिखलवाडी,पोवारवाडी,शिंगटेवाडी येथे गव्याचे दर्शन झाल्याने लोकांनी त्यास हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास शिंगटेवाडी येथून मोरणा नदीकडे हुडकवले आहे. सोमवारी देववाडी येथे गव्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे रात्री शेतात पाणी पाजण्यासाठी जाताना लोक घाबरत आहेत.


Post a Comment

0 Comments