शिराळे खुर्द (ता.शिराळा ) येथील महिला ग्रामसेवक पी.एम.पाटील यांच्या प्रेरणेने गरजूंना मोफत वाटण्यासाठी मास्क तयार करण्यात व्यस्त आहेत. |
ग्रामसेवकच्या प्रेरणेतून त्यांनी शिवले ५०० मास्क
शिराळा,ता.१९: शिराळे खुर्द (ता.शिराळा ) येथील महिलांनी ग्रामसेवक पी.एम.पाटील यांच्या प्रेरणेने गरजूंना मोफत वाटण्यासाठी ५०० कापडी मास्क तयार केले आहेत. प्रत्येक गावात शिलाई काम करणाऱ्या महिला व पुरुष आहेत.त्यांनी मनावर घेतले तर गावातील लोकांना लागणाऱ्या मास्कचा पुरवठा गावातल्या गावात होईल. त्यामुळे टाईमपास,गावातील लोकांची सुरक्षितता व समाजसेवा ह्या त्री सूत्रीचा सुरेख संगम होईल.ग्रामसेवक पी. एम. पाटील हे सध्या बिळाशी येथे कार्यरत असून त्यांचे शिराळे खुर्द येथे एकत्रित कुटुंब आहे. सगळीकडे लॉक डाऊन असल्याने महिला घरीच बसून आहेत. ग्रामीण भागातील खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या शेतीच्या मशागतीची कामे काही प्रमाणात आटोपली आहेत. त्यामुळे घरी शिलाई मशीन असल्याने त्यांच्या पत्नी सौ. राजश्री पांडुरंग पाटील यांनी सौ. रोहिणी उदय कवठेकर, सौ. सविता विशाल माळी, श्रीमती अनिता सतीश महाडिक व काही मुलींच्या मदतीने जवळपास ५०० पर्यंत मास्क बनविले आहेत. एक मीटर कपड्यात १६ मास्क तयार होतात. मध्यम स्वरूपाचा साधा एक पदरी एक मास्क तयार करण्यासाठी ४ ते ५ रुपये खर्च येतो आहे. त्यांचा हा उपक्रम अतिशय समाजोपयोगी व अनुकरणीय आहे. हा आदर्श इतर गावातील लोकांनी घेतला तर टाईमपास,समाजसेवा व लोकांची सुरक्षितता ह्या त्री सूत्रीचा योग्य उपयोग होईल.
0 Comments