BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

‘विश्वास’ कारखाना उच्चांकी गाळप करेल- उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील

                        
चिखली ः विश्वासराव नाईक कारखान्याच्या गळीत हंगामाची गव्हाणीत मोळी टाकून सुरूवात करताना उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरूडकर,,सौ.सुनितादेवी नाईक  व संचालक मंडळ.

 ‘विश्वास’ कारखाना उच्चांकी गाळप करेल- उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील

विश्वास’ कारखाना गळीत हंगाम शुभारंभ

शिराळा (प्रतिनिधी) ः राज्यात आता महाराष्ट्र विकास आघाडी हे शेतकरी हिताचे सरकार सत्तेवर येणार असून ते शेती, शेतकरी, सहकारी संस्था व कारखानदारीच्या हिताचे निर्णय घेवून सर्व घटकांचा फायदा करेल, असा आशावाद ‘विश्वास’चे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर यांनी व्यक्त केला.
चिखली (ता. शिराळा) येथे आज ‘विश्वास’ कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरूवात झाली. या प्रसंगाने ते बोलत होते. 
यावेळी पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात केंद्र व राज्य सरकारचे सहकारी साखर कारखानदारी बाबतचे धोरण उदासिन होते. अतिरिक्त साखर साठ्याचा प्रश्न गंभीर आहे. पंतप्रधानांच्या कृपेमुळे डिझेलचे दर भरमसाठ वाढले आहेत. परिणामी ऊस वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. शिल्लक साखरेचा उठाव होत नाही. साखरेचे बाजारातील दर व प्रत्यक्ष उत्पादनास येणारा खर्च याचा मेळ बसविण्यात कारखानदारांची कसरत होत आहे. एकूणच सहकारी साखर कारखानदारीपुढे अजूनही अडचणी खूप आहेत.
ते म्हणाले, सन २०१८-१९ च्या गळीत हंगामात ‘विश्वास’ने एफ.आर.पी. ची सर्व रक्कम वेळेवर अदा केली आहे. २०१९-२० मधील गळीत हंगामात ‘विश्वास’ कारखाना उच्चांकी गाळप करेल. तोडणी व वाहतूकची यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली आहे. नोंदीनुसार तोडणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. ऊस उत्पादकांनी पिकवलेला सर्व ऊस विश्वास कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे. ज्यांनी शेतकर्‍यांनी अद्याप ऊसाची नोंद केलेली नाही, त्यांनी त्वरीत आपल्या विभागातील कारखाना गट ऑफिसशी संपर्क साधून नोंद करावी.
प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष पाटील व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. या वेळी सौ. सुनितादेवी नाईक, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग व मनिषादेवी नाईक, तालुक्याचे माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंग नाईक, ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंग नाईक, तालुक्याचे उपसभापती सम्राटसिंग नाईक, संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे-पाटील, विजयराव नलवडे, बाबुराव नांगरे, मानसिंग पाटील, शामराव मोहिते, हंबीरराव पाटील, सुरेश पाटील, डॉ. राजाराम पाटील, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय राणे, विश्वास पाटील, मानसिंग पाटील, यशवंत दळवी, निवास जगताप, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, भीमराव गायकवाड, बिरुदेव आंबरे, विष्णू पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार, यु. जी. पाटील, अरुण साळुंखे, बाबासो पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सचिव सचिन पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments