BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श आचार संहितेचे पालन करा - निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर

निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर

आदर्श आचार संहितेचे पालन करा - निवडणूक निर्णय अधिकारी  अरविंद लाटक

 शिराळा, ता.२१:सर्वांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे असे आवाहन शिराळा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  अरविंद लाटकर यांनी केले.तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.यावेळी लाटकर म्हणाले; आचार संहिता लागू झाल्याने राजकीय पोस्टर काढावीत.कोणी ही विकास कामांची उदघाटन अथवा भूमिपूजन करू नयेत. सभा बैठकांची पूर्व परवानगी घ्यावी.  या मतदार संघासाठी ३३४ मतदान केंद्र आहेत.अतिवृष्टी व पुरामुळे विधानसभा मतदार संघातील पूर्वीच्या ११ मतदार केंद्राची पडझड झाली आहे.

 

  

त्यामुळे कांदे (२९८), जिल्हापरिषद मुलींची शाळा नंबर २ ऐवजी जिल्हापरिषद  मुलांची शाळा १, चरण (१३६), जिल्हापरिषद प्राथमिक शाळा नं २ ऐवजी अंगणवाडी क्रमांक १६८, मोहरे (१३८), जिल्हापरिषद प्राथमिक शाळा ऐवजी व्यायाम शाळा मोहरे. शिरशी (९९),(१००), जिल्हापरिषद मराठी शाळा  ऐवजी भैरवनाथ विद्यालय.वशी (२४६),(२४७),(२४८), जिल्हापरिषद प्राथमिक शाळा ऐवजी लोकनेते राजाराम बापू पाटील विद्यालय वशी.कणेगाव(३२८), कणेगाव हायस्कूल(जुनी जिल्हापरिषद शाळा) ऐवजी  कणेगाव हायस्कूल कणेगाव. चिकुर्डे(३२१), भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जुनी इमारत ऐवजी भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. येडेनिपाणी (२२५)  अंगणवाडी केंद्र ३३७ ऐवजी जिल्हापरिषद शाळा या ठिकाणी मतदान केंद्र बदलण्यात आले आहे. विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, ग्रामसेवक,तलाठी,कृषी सहायक, बी.एल.ओ ,पोलीस पाटील,विविध खात्यांचे खाते प्रमुख उपस्थिती होते.यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार राजाराम शिद,गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments