BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिखलीच्या नाईक महाविद्यालयाने पटकावला पै.हरीनाना पवार फिरता चषक

चिखली: विटा येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेतील पै. हरिनाना पवार फिरता चषक प्राप्त विद्यार्थ्या समवेत संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, प्राचार्य डॉ.एस.आर.पाटील, क्रीडा शिक्षक सतीश माने,पांडुरंग चौगुले

चिखलीच्या नाईक महाविद्यालयाने पटकावला पै.हरीनाना पवार फिरता चषक

खशाबा जाधव कुमार केसरी स्पर्धेत यश
शिराळा, ता.१९:चिखली ( ता. शिराळा ) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाने विटा येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठच्या विभागीय फ्रिस्टाइल  कुस्ती स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळून पै. हरिनाना पवार फिरता चषक  पटकावला. महाराष्ट्र राज्य खशाबा जाधव कुमार केसरी स्पर्धेत यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये शुभम विष्णू घोडे  (बी.ए .भाग एक ) ६१ किलो गटात प्रथम क्रमांक,
प्रथमेश बाबासो गुरव (बी.ए. भाग एक ) ७o किलो गटात प्रथम क्रमांक,
अनिकेत नंदकुमार पाटील   (बी.ए .भाग एक ) ७४ किलो गटात प्रथम क्रमांक
राहुल विजय माने ( बी.ए. भाग एक ) ६५ किलो गटात  द्वितीय क्रमांक ,  निखिल नंदकुमार  पाटील  , अनिकेत नंदकुमार पाटील ( बी.ए. भाग तीन ) ८६ किलो गटात द्वितीय क्रमांक, संदेश सर्जेराव शिंदे  (बी.ए. भाग एक ) १२५  गटात तृतीय , तर महाराष्ट्र राज्य खाशाबा जाधव कुमार केसरी स्पर्धेत

शुभम विष्णू घोडे (बी.ए. भाग एक )  ६१ किलो गटात  व्दितीय क्रमांक , प्रथमेश बाबासो गुरव (बीए भाग एक )  ७० किलो गटात व्दितीय , अनिकेत नंदकुमार पाटील (बी.ए .भाग एक )  ७९ किलो गटात  व्दितीय क्रमांक पटकावला. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी अभिनंदन केले . त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.एस.आर. माने यांचे मार्गदर्शन लाभले.
...........................................................................................................................
.या बातमीचा व्हिडी़ओ पाहण्यासाठी  आमच्या शिव न्यूज  चॅनेलला सबस्क्राईब करा

Post a Comment

0 Comments