BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आमचा देव अनंतात विलीन :शिवाजीराव देशमुख साहेबांच्यावर कोकरुड येथे अंत्यसंस्कार








आमचा देव अनंतात विलीन :शिवाजीराव देशमुख साहेबांच्यावर  कोकरुड येथे अंत्यसंस्कार 

गुरुवारी रक्षाविसर्जन

शिराळा,ता.१५:गावचे सुपुत्र,ज्येष्ट काँग्रेस नेते,विधान परिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या पार्थीवास कोकरुड ग्रामीण रुग्णालयाच्या मागे असलेल्या जागेत चिरंजीव सत्यजित यांनी मावळत्या सुर्याला साक्षी ठेवुन हाजारो जनसमुदयाच्या साक्षीने भडाग्नी दिला.  देशमुख यांच्या निधनामुळे तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
            वयाच्या ८४ व्या वर्षी सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असताना  देशमुख यांचे निधन झाले.
त्यांचा पार्थिव मुंबईहुन रुग्णवाहिकेतून सकाळी साडे आकरा वाजता शिराळा येथील काँग्रेस कमिटी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.नंतर साडे बारा वाजता कोकरूडकडे नेण्यात आला..दुपारी ३ च्या सुमारास निवासस्थाना पासुन फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा सुतार गल्ली-मारुती मंदीर,मुख्य मार्गावरुन काढण्यात आली.सायंकाळी ५ वाजता कोकरुड ग्रामीण रुग्णालयाच्या मागे असलेल्या जागेत चिरंजीव सत्यजित यांनी भडाग्नी दिला.यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधान परिषदेचे सभापती रामराजे निबाळकर,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील,राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील,आमदार बाळासाहेब थोरात,आमदार शिवाजीराव नाईक,आमदार मोहनराव कदम,आमदार कृपाशंकर सिंह,आमदार अनिल बाबर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,कोल्हापुर पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील,आमदार मुजफ्फर हुसेन,आमदार सुमनताई पाटील,आमदार विश्वजीत कदम,आमदार आनंदराव पाटील,आमदार त्र्यंबक भिसे,आमदार निरंजय डावखरे, माजी आमदार मानसिंगराव नाईक,माजी आमदार विनय कोरे,पृथ्वीराज देशमुख,अजितराव घोरपड़े,दिनकर पाटील,पी.एन.पाटील,भगवानराव साळुंखे,बाबासाहेब पाटील, काँग्रेस गटनेते शरद रणपीसे,विलासराव शिंदे,शरद पाटील,वैभव नायकवड़ी,विक्रम सावंत,जिल्हाधिकारी विजय काळम पाटील,विशाल पाटील,नामदेवराव मोहीते,भारत पाटणकर,वैभव शिंदे,शैलजा जयंत पाटील,हणंतराव पाटील उपस्थीत होते. 
अन साहेबांच्या सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. 
साहेबांचे अनेक वयोवृध्द सहकारी आपल्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी आले असताना सत्यजित यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत असल्याने सर्वच गहिवरत होते.

Post a Comment

0 Comments