आमचा देव चोरीला गेला: विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांचे निधन
उदया कोकरुड येथे अंत्यसंस्कार
शिराळा /प्रतिनिधीराष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ट नेते व माजी विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख ( वय ८४) यांचे मुंबई हॉस्पिटलमध्ये निधन झाले.त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
देशमुख यांनाच जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी तीलवणी ( ता हातकणंगले) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकरूड येथे तर माध्यमिक शिक्षण राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथे तर बी ए हे महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झाले .ते पंचायत समिती शिराळा येथे विस्तार अधिकारी म्हणून नऊ वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यानी नोकरीचा राजीनामा देऊन१९६७ मध्ये बिळाशी जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. १९६७ ते १९७२ दरम्यानपंचायत समिती सभापती म्हणून काम केले. यावेळी ते विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनकाम केले.१९७२ ते १९७४ दरम्यान जिल्हा परिषद मध्ये कृषी विभागाचे सभापती होते याच कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यालयात कार्यकारी परिषद सदस्य होते.
१९७८ ला पहिली विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली यानंतर सलग चार वेळा विजयी झाले. ८३ ते ८५ मध्ये सामन्य प्रशासन,गृह राज्य मंत्री म्हणून काम केले.८५ ला कृषी ,ऊर्जा व परिवहन राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कारभार होता .८५-८६ मध्ये पाटबंधारे, अन्न नागरी पुरवठा चे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले.८८-९० पुनर्वसन व ग्रामविकास मंत्री ,९१-९२ मध्ये सहकार ,संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण व परिवहन मंत्री होते.९३-९४ ला सार्वजनिक बांधकाम , याचवेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तसेच ९२ -९६ दरम्यान ते राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. अखिल भारतीय काँग्रेस चे सदस्य होते १९९६-२००२ विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.२००२ पुन्हा निवड झाली .
२००१ मध्ये विधानपरिषदेत उत्कृष्ट भाषणाबददल राष्ट्रकुल संसदीय मंडळ व महाराष्ट्र शाखेत कडून पुरस्कार देण्यात आला. २००४ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून निवड झाली. २००५ मधे युनायटेड किंगडम संसदे ५२ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अबूजा नायजेरिया येथे संसदीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते.२००७ मध्ये इस्लामाबाद , पाकिस्तान येथे तिसऱ्या आशिया भारत परिषदेला राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते . २००८ मध्ये तिसऱ्यांदा त्यांची विधानपरिषद वर बिनविरोध निवड झाली होती.ते सलग तीन वेळा विधानपरिषद वर सभापती निवड झाली यादरम्यान उल्लेखनीय काम केले २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे हस्ते उल्लेखनीय संसदीय कारकिर्दीसाठी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्यानी आजअखेर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम करत होते.
शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने ज्येष्ठ संसदपटू गमावला : मुख्यमंत्री*
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक ज्येष्ठ संसदपटू आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या श्री. देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकहिताशी जपलेली बांधिलकी लक्षणीय आहे. विशेषत: डोंगरी विकास योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुक्यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार मोलाचा ठरला. तसेच राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून विविध विभागांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांनी या वरिष्ठ सभागृहाचे प्रदीर्घ काळ केलेले नेतृत्व कायम स्मरणात राहील.
शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय पोकळी : पालकमंत्री सुभाष देशमुख
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.पालकमंत्री सुभाष देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पंचायत समिती विस्तार अधिकारी ते जिल्हा परिषद सदस्य, विधानपरिषद सभापती हा त्यांचा प्रवास सर्व सामान्यांना प्रेरणादायी आहे. शिराळा तालुक्यासह राज्यातील सर्व डोंगरी भागातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवाजीराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन डोंगरी तालुक्यांची परिषद भरवली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच राज्यात डोंगरी भागासाठीचे शैक्षणिक क्षेत्रात समान आरक्षण लागू झाले. त्याचा लाभ आज हजारो तरुणांना झाला. त्यांच्या या योगदानाचे राज्यातील डोंगरी तालुक्यातील जनतेला सदैव स्मरण राहील. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
आमचे मार्गदर्शक व डोंगरी विभागाचे शिल्पकार निघून गेल्याने महाराष्ट्राची हानी -आमदार शिवाजीराव नाईक :
त्यांची सामाजिक जीवनातील शिकवण आम्हाला प्रेरणादाई आहे.
..काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांनी मंत्रिमंडळातील बहुतांशी खाते अतिशय सक्षमपणे सांभाळली म्हणून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर सोपवल्या. त्यांनी डोंगरी विभाग व महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. माझ्या वैयक्तिक जीवनात त्यांनी दिलेली शिकवण आम्ही कायमस्वरूपी ध्यानात ठेऊ. त्यांचं जाणं आम्हाला अतीव दुःख देणार आहे. बराच काळ आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यांचे राजकीय आणि सामजिक क्षेत्रातील योगदान आम्ही कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामजिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. चांदोली धरणाच्या वादात चांदोली की खुजगाव यामध्ये त्यांनी अतिशय कणखर भूमिका घेतली होती. त्यांचे विचार आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी राहतील.
शिवाजीराव देशमुख यांचे निधनाने महाराष्ट्र ची सर्व क्षेत्रातील न भरून येणारी हानी झाली आहे.- माजी आमदार मानसिंगराव नाईक
त्यांचा जन्म ग्रामीण भागात झाला असला तारीही त्यानी राजकीय क्षेत्रात स्वकर्तुत्वाने आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष व विधानपरिषदेचे सभापती पद भूषउन तालुक्याचा नावलौकिक देशभर पसरवला. डोंगरी विभागाची संकल्पना मांडून शिराळासह राज्यातील अनेक तालुक्यांना फायदा होऊन विकासाचा चेहरा देण्याचे मोठे काम केले आहे. अजात शत्रू ,सर्वसमावेशक ,स्वच्छ , चरित्र संपन्न , कॉंग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यानी वेगळी ओळख निर्माण केली होती.
शिवाजीराव देशमुख साहेब हे सामान्य जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व होते - ना.सदाभाऊ खोत
एक ग्रामीण भागातील डोंगर कपारी मधील जनतेशी एक नाळ असलेले नेतृत्व एका डोंगराच्या खुशीत वसलेल्या गावातून वसंतदादा पाटील यांचा विश्वास संपादन करून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. आणि शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस व दादाघराण्याशी एकनिष्ठ राहिले. या माणसाने आयुष्यात अनेक उंच शिखरे सर केली. पण ही शिखर सर करत असताना त्यांच्यातील नम्रता ही खऱ्या अर्थाने व्यखण्या सारखी होती. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची जाण असलेलं हे एक संयमी नेतृत्व होत. सर्व पक्षातल्या कार्यकर्ते व नेत्यांशी त्यांचे संबंध आपुलकीचे व जिव्हाळ्याचे होते. विधानपरिषदेच्या सभागृहात मी शपथ घेतल्या नंतर सत्ताधारी बाकावरून मी माझी पाऊले ज्यावेळी चालायला लागली त्यावेळी अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सभागृहात शेवटच्या एका बाकावरती देशमुख साहेब बसलेले होते त्यांच्याकडे माझे लक्ष गेले. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावरती डोक ठेवलं त्यावेळी त्यांनी माझा हातात हात घेतला त्यावेळी ते मला एकच वाक्य बोलले की, खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्यांच्या नेत्याला न्याय मिळाला.त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान विमानतळावर आमची भेट झाली होती. विमानाला उशीर झाला होता. त्यावेळी जवळपास तीन तास त्यांनी मार्गदर्शन केले, जुन्या आठवणी सांगितल्या, त्यांच्या परिवाराचा स्वतंत्र्य लढयातील योगदान, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या आठवणी जाग्या केल्या, जनतेच्या मनात त्यांच्याबाबतीत आदर कायम राहिला असा आकाशा एवढा नेता हरपला. त्याना सरकार, रयत क्रांती संघटना यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
सदाभाऊ खोत
कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता, राज्यमंत्री
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली। देशमुख साहेब हे माझे मार्गदर्शक होते। माझ्या राजकीय कारकिर्दीतल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा पाठिंबा व मार्गदर्शन मला मोलाचे होते। लोकसभा निवडणुक मी लढविली त्यावेळी मला बराच विरोध झाला होता त्यावेळी देशमुख साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। त्यांचे डोंगरी भागासाठी विकासासाठी केलेले काम दिशादर्शक आहे। देशमुख साहेब हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे।
-आ.पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)
कोकरुड येथे अंत्यसंस्कार
उद्या सकाळी ७:४० वाजता मुंबई वरुन विमानाने सकाळी ९ वाजता कोल्हापुर येथे आणणार.कोल्हापुर हुन शिराळा काँग्रेस कमेटी मध्ये १० ते ११ पर्यंत ठेवण्यात येणार आहे.तेथून कोकरुड येथे १२ ते १ पर्यंत कोकरुड येथील हिरा निवास या ठिकाणी ठेवण्यात येईल. दुपारी २ वाजता अंत्ययात्रा निघेल. सायंकाळी ४ च्या सुमारास कोकरुड येथील पोलिस स्टेशन च्या मागे असणाऱ्या मैदानावर अंत्यसंस्कार होतील.
0 Comments