BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पितृशोक

वड़िलांना भडाग्नी देताना विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व लहान बंधु विकास नांगरे पाटील



विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पितृशोक

                                                                 कोकरुड येथे अंत्यसंस्कार

शिराळा,ता.४ कोकरुड ता.शिराळा येथील नामंकित  पैलवान नारायण पांडुरंग नांगरे (आबा) यांचे आज दुपारी कोल्हापुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.निधनाचे वृत्त समजताच कोकरुड गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व व्यापारी यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून श्रद्धाजंली वाहिली.           आबा यांचा  यांचा शेतकरी कुटुबीत जन्म झाला.आबा हे कोकरुड परिसरातील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा लौकिक होता.तालुक्यात साखर कारखाना नव्हता त्यावेळी त्यांनी उसावर प्रक्रिया करण्यासाठी गुह्राळगृह सुरु केले.त्यांना कुस्तीचे वेढ असल्याने आपली मुलेही कुस्ती क्षेत्रात असावी अशी त्यांची इश्च्या होती. शेती बरोबरच राजकरण आणि समाजकारण केले. त्यांचे काम पाहून विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांनी गावचे सरपंच, तालुक्याचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी काम करण्याची संधी दिली.गेल्या चार महिन्या पासुन त्यांच्यावर कोल्हापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.आज दुपारी १ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.ही घटना गावात समजताच अक्खे गांव दुःखच्या सागरात कोसळले.त्यांचा मृतदेह दुपारी ३ च्या सुमारास गावात आणण्यात आला.त्यानंतर गावातील देशमुखवाडा मार्गे मारुती मंदीर निनाई मंदिरा पासुन मुख्य बाजार पेठेतुन टाळाच्या गजरात अंत्ययात्रा काढण्यात आली.आबा यांचे मोठे पुत्र विश्वास नांगरे -पाटील यांनी भडाग्नी दिला. रक्षाविसर्जन गुरुवार दि.६ रोजी कोकरुड येथे सकाळी १० वाजता आहे.
यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख, जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा,कोल्हापुरचे जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख,साताराचे पोलिस प्रमुख संदीप पाटील, माजी पोलिस महानिरीक्षक गुलाबराव पोळ, उपाधीक्षक किशोर काळे,खरेदी-विक्रीचे चेअरमन संपतराव देशमुख,माजी सभापती बाळासाहेब पाटील, हणमंत पाटील,अभिजीत पाटील उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments