मराठा आरक्षणासाठी स्त्यावर उतरुच पण वेळ प्रसंगी जनावरांच्या गळ्यातील लोडणे हातात घेऊ :विजयसिंह महाडीक
शिराळा:सरकारने १५ नोव्हेंबर पर्यंत मराठा आरक्षण जाहीर केले नाही तर ठोक मोर्चासाठी इतर समाज बांधवांना सोबत घेऊन स्त्यावर उतरुच पण वेळ प्रसंगी ग्रामीण भागातील आमचा शेतकरी बांधव जनावरांच्या गळ्यातील लोडणे हातात घेऊन रस्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडीक यांनी दिला.शिराळा येथील विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी ते म्हणाले,आत्ता पर्यंत शांततेत मोर्चे काढले पण या शासनाने नेहमी वेळ काढु पणा केला आहे.हे फसवे सरकार असल्याने आम्हाला ठोक मोर्च्याशिवाय पर्याय नाही.आमच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा म्हणून स्वतंत्र २५ टक्के आरक्षण द्यावे.सरकारने मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत.आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व मराठा आमदार, खासदार व महत्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांनी राजीनामे द्यावेत.१८ नोव्हेंबर नंतर निघणारे बोलके ठोक मोर्चे कोणालाही परवडणारे नसतील.
विनायक मेटे मराठ्यासाठी खोटे
शिवस्मारकाची उंची २८ मीटरने कमी करण्यात येणार आहे.हे खरे की खोटे हे मेटेंनी सांगावे,त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कार्यकर्त्याचा समुद्रात बुडुन मृत्यु झाला.स्मारक बांधकामास विलंब लागत आहे याची नैतिक जबाबदारी स्विकारुन मराठ्यांशी गद्दारी करुन मिळवलेल्या आमदारकीचा राजिनामा द्यावा.
त्यांना स्माकरच नको
भूमिपूजन कार्यक्रमात पुढे पुढे करणाऱ्या पुरषोत्तम खेडेकर शिवस्मारकाची जागा बदला म्हणत आहेत.कारण त्यांना हे स्मारक होऊ द्यायचे नाही.जागा बदलायची होती तर त्याचवेळी का बोलले नाहीत.या अर्थ त्यांना हे स्मारक नको
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष पाटील, राज्य समन्वयक विनायक गायकवाड, सरचिटणीस वैभव घोरपडे, तालुकाध्यक्ष अभिषेक पाटील, अजय जाधव, प्रमोद पवार, बाबासो गायकवाड, विनोद कदम, राजेंद्र थोरात, विकास रोकडे, संतोष हिरुगडे, निलेश आवटे, स्वप्नील निकम, अमोल काटकर उपस्थित होते.
0 Comments