"हाक तुमची साथ आमची" : जि. प. अध्यक्षा शैामिकाताई महाडीक
झिम्मा-फुगडी स्पर्धेस शिराळा वाळव्यातुन उत्सफुर्त प्रतिसाद
शिराळा :झिम्मा-फुगडी स्पर्धेच्या माध्यमातून "हाक तुमची साथ आमची" ही भुमीका घेवून युवा नेते सम्राट महाडीक यांनी उचललेले पहिले पाऊल महिलांच्या गर्दीवरून निर्णायक असल्याचे दिसून येत आहे, प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शैामिकाताई अमल महाडीक यांनी केले.येथे साई संस्कृती कार्यालयात महाडीक युवा शक्ती वनश्री महिला संस्था यांचे वतीने पारंपारीक लोककला स्पर्धा झिम्मा-फुगडीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.
महाडीक म्हणाल्या,मराठी संस्कृति व पंरापरा मोठी आहे. त्याची जपणूक होणे गरजेचे आहे. नव्यापिढीला त्यांची ओळख व्हायला हवी. पारंपारीक चाली, खेळाची ओळख नव्या पिढीला व्हायला हवी.
सम्राट महाडीक म्हणाले, कोणताही राजकीय उद्देश डोळ्यासमोर न ठेवता महाडीक युवा शक्ती आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवून गेली १२ वर्षे शिराळा व वाळवा तालुक्यात अग्रेसर राहीली आहे.या मतदार संघातील नेत्यांनी युवकांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला.मात्र महाडीक युवा शक्तीच्या माध्यमातून आम्ही नोकरी मेळावा घेवून एका दिवसात ८५० युवकांच्या हाताला काम मिळवून दिले.ज्याठिकाणी अन्याय होतोय अशा ठिकाणी महाडीक युवा शक्ती ठाणे उभी राहते.महिलांना सक्षम व आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणेसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून नेहमीच अग्रेसर राहिलो आहे.
यावेळी सरपंच मिनाक्षीताई महाडीक,तेजस्विनीताई महाडीक यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्तावीक विद्याताई पाटील यांनी केले.यावेळी युवा नेते राहूल महाडीक, हर्षदा महाडीक,जि.प.सदस्य जगन्नाथ माळी, नगरसेवक केदार नलवडे,राम जाधव, श्रीमती उज्वला पाटील,सोनालीताई महाडीक,कृष्णाताई महाडीक,संध्याताई, महाडीक,डॉ. जयश्री पाटील,सरपंच कांचन देसाई,अर्चना कदम,प्रियांका नलवडे,सुरेखा पाटील,अनिता ओसवाल, उपस्थित होत्या.
0 Comments