पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून शिराळ्यात वारंवार बलात्कार
मुंबई येथील बांद्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय रामचंद्र काळे मुळगाव सरूड (ता.शाहूवाडी) यांनी लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी, सदर युवती कोकरूड येथे महाविद्यालयात शिकत आहे.तिची ओळख २०जून २०१६रोजी उदय याच्याशी झाली.नंतर उदयने तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर मी तुला नोट्स देईन असे सांगितले. २९ ऑगस्ट २०१६ रोजी मी तुझ्याशीच लग्न करणार असल्याचे त्याने युवतीस सांगितले. तो मित्र मैत्रिणींनाही लग्न करणार असल्याचे सांगत होता. या नंतर १५नोव्हेंबर २०१६ रोजी सदर युवतीचा वाढदिवस होता. यावेळी ते दोघे वाढदिवस साजरा करण्यासाठी एम.एच.०९ ९५०१ मोटारसायकल वरून शिराळा येथील हॉटेलमध्ये आले. वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आपण लग्न करणार आहोत असे म्हणून युवतीच्या विरोधाला डावलुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर वारंवार याच हॉटेल मध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. यानंतर सप्टेंबर २०१७पासून मी तुच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगून बोलणे व फोन घेणे बंद केले. याबाबत या युवतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.मात्र सदरची घटना शिराळा येथे घडल्याने शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करत आहेत.
2 Comments
भयानक आहे हे
ReplyDeleteMe too
ReplyDeleteप्रकार