शिराळा नगरपंचायतचा प्लास्टीक वापरकर्त्या दुकानदारांना झटका
३० हजाराचा दंड वसुल
नगरपंचायतच्या भरारी पथकाची कारवाई: १० किलो प्लास्टीक जप्त
शिराळा नगरपंचायतच्या पथकाने शिराळा बाजारपेठेतील दुकानावर प्लास्टीक पिशवीबाबत धाडी टाकुन १० किलो प्लास्टीक जप्त करुन संबंधीतकडुन ३० हजाराचा दंड वसुल केला.शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली या भरारी पथकाने आज किराणा दुकान,बेकरी,कापड दुकानावर धाडी टाकल्या.या पथकात मुख्याधिकारी अशोक कुंभार,अधिक्षक सुभाष इंगवले,पाणी पुरवठा विभाग प्रमुख संजय इंगवले,आबाजी दिवाण,सदानंद टिळे,लक्ष्मण मलमे,गणपती यादव यांचा समावेश होता.
0 Comments