BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आरोग्य शिबिरामध्ये ३७०रुग्णांची तपासणी व उपचार


शिराळा : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त फत्तेसिंगराव नाईक एंडोमेंट ट्रस्ट चिखली, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल मार्फत आयोजित सर्वरोग तपासणी व उपचार शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. शिबीरात एकूण ३७० रुग्णांची तापासणी व औषधोपचार झाले.
सकाळी साडेनऊ वाजता ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समुहाचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. मुबीन मोमीन (एम.डी.), डॉ. अमन पाटील (सर्जन), डॉ. कपिल घोरपडे (अस्थी रोग, संधी विकार तज्ञ), डॉ. अमर पाटील (फिजीशिअन),  डॉ. सुनील वाळवेकर व डॉ. गणेश चौगुले (दंत रोग तज्ञ), डॉ. विनायक महानवर (बालरोग तज्ञ), डॉ. कैलाश कदम (फिजिशियन), डॉ. गणेश चौगुले, डॉ. शैलेश माने (अर्थोपेडीक) यांनी तपासणी व उपचार केले. 
या वेळी प्रदेश राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे सरचिणीस डॉ. तुषार कणसे, जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद गायकवाड व डॉ. राजन अडिसरे, सरचिटणीस डॉ. अमित सुर्यवंशी, सचिव डॉ. रुपेश पाटील, डॉ. राहूल सूर्यवंशी समन्वयक, डॉ. विक्रम गावडे आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments