BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मराठी संस्कृति व पंरापरेची जपणूक गरजेची: अक्षया देवधर

शिराळा येथे प्रचिती सांस्कृतिक मंच मार्फत झालेल्या जागर मंगळागौरीचा या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलता टि.व्ही. कलाकार अंजली देवधर. व्यासपीठासर माजी आमदार मानसिंगराव नाईक, सौ. सुनितादेवी नाईक, अश्विनी नाईक, मनिषा नाईक, सुनंदा सोनटक्के आदी.

 मराठी संस्कृति व पंरापरेची  जपणूक  गरजेची: अक्षया देवधर

 मराठी पंरपरा व संस्कृति जपणे व वाढवण्यासाठी प्रचिती सांस्कृतिक मंचने राबलिले उपक्रम स्तूत्य आहेत, असे प्रतिपादन तुझ्यात जीव रंगला मधिल रानदाची अंजलीबाई उर्फ अक्षया देवधर हिने केले.
शिराळा येथे प्रचिती सांस्कृतिक मंच व फत्तेसिंगरावा इंडोमेंट ट्रस्ट मार्फत झालेल्या जागर मंगळागौरीचा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. माजी आमदार मानसिंगराव नाईक व सौ सुनितादेवी नाईक प्रमुख उपस्थित होत्या.
श्री. देवधर म्हणाल्या, मराठी संस्कृति व पंरापरा मोठी आहे. त्याची जपणूक होणे गरजेचे आहे. नव्यापिढीला त्यांची ओळख व्हायला हवी. जसे तुम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेवून त्याची जपणूक करत आहात. त्याच प्रमाणे आम्ही कलाकार मराठी मालिंकामधून मराठी संस्कृति, पंरपरंची समजाचा ओळख करून देत आहोत. जागर मंगळागौरचा मधील गाणी व त्याच्या पंरपरिक चाली, खेळाची ओळख नव्या पिढीला व्हायला हवी. माजी आमदार नाईक यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागातील महिलांना बळ व व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
सौ. नाईक म्हणाल्या, जागर मंगळागौरीचा उपक्रम गेल्या चार वर्षापासून राबविला जात आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक सातत्याने माहिलांसाठी विविध उपक्रम राबवित आले आहेत. त्यांनी महिलांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मानसिंंगभाऊंच्या व्यतिरीक्त इतर मंडळी महिलांसाठी किती उपक्रम राबवितात, हे समाजाने पहावे. त्यांनी फक्त महिलांची मते मिळवण्याचे काम केले आहे. शिराळा मतदार संघात महिलांची संख्या विचारात घेता अधिक आहे. असे असताना महिलांच्या प्रतिसाठी कोण झटत आहे, याचा लेखा जोखा होणे गरजेचे आहे.
प्रारंभी लोकनेते कै. फत्तेसिंगराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रचिती सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष डी. एन. मिरजकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार झाला. प्रास्तविक एस. एम. पाटील यांनी केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, मनिषाताई नाईक अ‍ॅड. शुभलक्ष्मी नाईक, आरती नाईक,  स्वाती जावळे, नगरसेवक सुनीता निकम, सुजाता इंगवले, प्रतिभा पवार, डॉ. प्रीया (मनिषा) यादव, डॉ. मिनाक्षी पाटील, वंदना यादव, अनुसया माने, वंदना गायकवाड, दिनकर नायकवडी, निता जोखे, स्मीता महिंद, धनाजी चव्हाण, अरिष इनामदार, कल्पनाताई कुंभार, साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष आर. बी. शिंदे, डी. जी. अत्तार आदी उपस्थित होते. साधना पाटील यांनी सुत्रसंचालन केले. शिराळ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments