मिलिंद कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
शिराळा:६ जि. प.शाळा भाटशिरगांव येथील उपक्रमशील शिक्षक मिलिंद भिवा कांबळे यांना यंदाचा स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्था कामेरी यांचेमार्फत दिला जाणारा स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.संस्थेमार्फत शैक्षणिक,शेती,कला,क्रीडा,साहित्य इ. क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल गुणवंतांचा सत्कार करणेत येतो;कांबळे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांना गट शिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख,शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू दळवी,केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळे यांचे मार्गदर्शन लाभले.
1 Comments
Abhinandan kamble sir
ReplyDelete