BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिरशीत दीड लाखाचा दरोडा

 
शिरशी:येथे अज्ञात चोरट्यानी असे साहित्य विस्कटून टाकले.

शिरशी येथे दीड लाखाचा दरोडा

शिराळा ,ता.१९:शिरशी (ता. शिराळा) येथे दोन ठिकाणी अज्ञात सहा चोरट्यांनी लोखंडी गज व कोयत्या ने  जिवे मारण्याची धमकी देऊन टाकलेल्या दरोडयात एक लाख ५० हजार  रुपयांचे  पाच  तोळे सोने व चांदीचे दागिने, रोख रक्कम व  तिन मोबाईल असा असा ऐवज लंपास केला.अशोक नामदेव शिरसट, मालुबाई आनंदा महिंद हे दोघे चोरट्यांच्या हल्ल्यात किरकोळ  जखमी झाले आहेत. हि घटना मध्यरात्री घडल्याने शिरशी व परिसरातील गावात भीतीचे वातावरण पसरले होते.
हि घटना आज बुधवार  रोजी पहाटे २:३० ते ३ च्या दरम्यान घडली. या बाबत शिराळा पोलीसानी दिलेली माहिती अशी की, आज बुधवार रोजी   हरिबा आनंदा महिंद याचे घरात मध्यरात्री २ च्या दरम्यान तसेच मध्यरात्री अडीच ते तीन च्या दरम्यान शिरशी येथील शासकीय  दवाखान्या जवळ रहात असलेल्या सुनंदा अशोक शिरसट यांच्या घरात अज्ञात सहा चोरट्यानी प्रवेश करून लोखंडी गज व कोयत्याचा धाक दाखवून तसेच मारहाण करून दरोडा टाकला .
   काळे जरकीन व जिन्स घातलेल्या पंचवीस ते तीस वर्षे च्या सहा चोरट्यांनी सुनंदा शिरसट यांचे घरातील ३३ ग्राम  व आनंदा महिंद यांचे घरातून १५ ग्राम असे एकूण ४८ ग्रॅम  चे गळ्यातील पदक व मंगळसुत्र व दहा हजार रुपये तसेच लोखंडी पेटीत ठेवलेले मुलगी चे पंधरा ग्रॅम चा गोफ, कानातले कर्णफुले, सोन्याचे वेल, मंगळसूत्र, सोन्याची चेन, सहा सोन्याचा अंगठ्या, पैजण व तीन मोबाईल लंपास केले.  चोरट्यांनी लोखंडी गज व कोयत्याने धाक दाखवत घरातील व्यक्तींच्या अंगावर बसून हि लूट केली. या मारहाणीत मालुबाई महिंद व अशोक  शिरसट हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
     यादरम्यान धाडसाने सुनंदा यांनी  चोरट्याना चकवा  गावाकडे मदतीसाठी धाव घेऊन आरडाओरडा केला. शेजारचे लोक जागे व गोळा होताच चोरटे पसार झाले. शिराळा पोलिसाना संजय महींद यानी या घटनेची माहिती दिली. पोलीस लगेच शिरशी दाखल झाले. परिसरातीत पोलीस व ग्रामस्थ यांनी शोध घेतला.पण कोणी हाती लागले नाहीत. या बाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव हे करीत आहे.

चोरट्यांनी मोटरसायकलच्या प्लगची  वायर तोडली  

याच परिसरात आणखी चार ठिकाणी चोरट्यानी चोरी करण्याचा प्रयत्न केला. संजय महिंद यांच्या हि घरी चोरीचा प्रयत्न केला.पण आतून दरवाज्या घट्ट असल्याने त्यांचा प्रयत्न फसला.जाताना आपला कोणी पाठलाग करू नये म्हणून संजय यांच्या अंगणातील मोटरसायकलच्या  प्लुगची केबल चोरट्यानी तोडल्या .लोकांनी रात्रीच आपल्या परिसरातही लोकांना मोबाईल वरून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

तीन आठवड्यात हि दुसरी चोरी
तीन आठवड्या पूर्वी धामवडे येथे भर दिवसा नितीन मादळे यांच्या घरी दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी झाली होती. 

Post a Comment

1 Comments